घोडबंदर पट्ट्यात भाजपला खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:46 IST2021-08-20T04:46:20+5:302021-08-20T04:46:20+5:30

ठाणे : एकीकडे भाजपकडून जनआशीर्वाद यात्रा काढली जात असतानाच ठाण्यात मात्र भाजपला खिंडार पडू लागले आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे ...

BJP cracks in Ghodbunder belt | घोडबंदर पट्ट्यात भाजपला खिंडार

घोडबंदर पट्ट्यात भाजपला खिंडार

ठाणे : एकीकडे भाजपकडून जनआशीर्वाद यात्रा काढली जात असतानाच ठाण्यात मात्र भाजपला खिंडार पडू लागले आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्यासह घोडबंदर पट्ट्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी उपस्थित होते. पुरुषोत्तम पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच कार्यरत होते. मात्र, मधल्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी स्वगृही प्रवेश केला आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रभाकर रोकडे, ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष लक्ष्मण राठोड, अभिजित छत्रपती पाटील, राहुल पाटील, प्रमोद जाधव, माधव जाधव यांच्यासह शेकडो जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Web Title: BJP cracks in Ghodbunder belt