शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

BSUP योजनेत २५० कोटींचा गैरव्यवहार, भाजप नगरसेविका पेंडसेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:47 IST

महापालिकेने प्रत्येक घरामागे ४ लाखांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यामुळे ६३४३ घरांसाठी तब्बल २५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन (जेएनएनयुआरएम) या योजनेअंतर्गत २००८ साली शहरी गरीबांसाठी बीएसयूपी योजना जाहीर झाली होती. पालिकेने चार टप्प्यात या योजनेचे प्रस्ताव मंजूर केले.

ठाणे - शहरात बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर (बीएसयूपी) या योजनेअंतर्गत १२,५५० घरे उभारणीचे डीपीआर केंद्र सरकारने मंजूर केले होते. या कामांसाठी ५६८ कोटी रुपये खर्च येईल, असे गृहित धरून ही मंजूरी देण्यात आली होती. मात्र, गेल्या १५ वर्षांत ठाणे महापालिकेने जेमतेम ६३४३ घरांची उभारणी केली असून त्या कामासाठी तब्बल ८०० कोटी रुपये खर्च केले आहेत. राज्य सरकारने गृहनिर्माणासाठी गतवर्षी जाहीर केलेले रेडी रेकनरचे दर जरी गृहित धरले तरी प्रत्येक घराच्या उभारणीसाठी ९ लाख रुपये खर्च व्हायला हवा होता. मात्र, पालिकेने त्यासाठी तब्बल १३ लाख रुपये खर्च केल्याची माहिती नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिली. 

महापालिकेने प्रत्येक घरामागे ४ लाखांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यामुळे ६३४३ घरांसाठी तब्बल २५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय सर्वसाधारण सभेत व्यक्त केल्यानंतर त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पारदर्शी पद्धतीने ही चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई होईल अशी आशा मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केली आहे.

जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन (जेएनएनयुआरएम) या योजनेअंतर्गत २००८ साली शहरी गरीबांसाठी बीएसयूपी योजना जाहीर झाली होती. पालिकेने चार टप्प्यात या योजनेचे प्रस्ताव मंजूर केले. मंजूर डिपाआरनुसार १२,५५० घरांच्या उभारणीसाठी ५६८ कोटी ९४ लाख रुपये खर्च होणार होते. त्यापैकी ५० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून तर ३० टक्के अनुदान राज्य सकराकडून दिले जाणार होते. ११ टक्के वाटा हा लाभार्थ्यांचा होता तर ९ टक्के हिस्सा ठाणे महापालिकेला अदा करायचा होता. या योजनेची मुदत डिसेंबर, २०१५ मध्ये संपली. मात्र, २०२१ साल उजाडले तरी १२,५५० पैकी ६,३४३ घरेच पालिकेला खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून उभारता आली आहेत. मंजूर डीपीआरपैकी (५६८ कोटी) जवळपास ५१ टक्के घरे पालिकेला उभारता आली आहेत. त्यामुळे या गृहनिर्माणावर ३१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, पालिकेने या कामासाठी तब्बल ८०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या घरांसाठी केंद्र सरकारकडून १४२ कोटींचे तर, राज्य सरकारकडून ८५ कोटींचे अनुदान अपेक्षित होते. परंतु, पालिकेने निर्धारित वेळेत काम न केल्याने अनुक्रमे १२५ कोटी आणि ६५ कोटी रुपयांचेच अनुदान मिळाले आहे. या घरांसाठी पालिकेच्या तिजोरीतून ९ टक्क्यांप्रमाणे फक्त २७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, पालिकने ६०९ कोटी ७९ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती मृणाल पेंडसे यांनी दिली आहे. पालिकेने ९ टक्के नव्हे तर तब्बल ७६ टक्के खर्च केला असताना  केंद्र आणि राज्याकडून ५० आणि ३० टक्क्यांऐपजी १५.५९ आणि ८.१३ टक्केच निधी मिळाला आहे. पलिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे पालिकेच्या तिजोरीवर हा अतिरिक्त भार पडला आहे.

अधिकारी कंत्राटदारांचे साटेलोटे

अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्यानेच बीएसयूपी योजनेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतरही ठाणे शहरातील गोरगरीब कुटुंबांच्या पदरी निकृष्ट घरे टाकण्यात आली आहेत. ही योजना योग्य पध्दतीने राबवली न गेल्याने सरकारचा २५३ कोटी रुपयांच्या अनुदानाला ठाणे शहर मुकले आहे. तर, त्यांच्याच वादग्रस्त कारभारामुळे जवळपास ५०० कोटींचा अतिरीक्त खर्चही झाला आहे. कामाला विलंब झाला, जागा ताब्यात मिळत नव्हती, भाववाढ झाली, घरांचे क्षेत्रफळ वाढले अशी अनेक कारणे त्यासाठी दिली जात आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांतले रेडी रेकनरचे दर गृहीत धरले तर प्रति चौसर फूट बांधकामासाठी २५०० रुपये खर्च व्हायला हवेत. मात्र, या योजनेतील घरांसाठी ३५०० रुपये प्रति चौरस फूट एवढा खर्च करण्यात आला आहे. रेडी रेकनर दरांपेक्षा पालिकेने तब्बल २५३ कोटी रुपये जास्त खर्च केले आहेत. त्यामुळे या गैरव्यवहाराची सखोल आणि पारदर्शी चौकशी व्हायला हवी अशी मागणी मृणाल पेंडसे यांनी केली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCorruptionभ्रष्टाचार