शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

"ऑनलाईन महासभेत अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज 'म्यूट' केला जातोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 19:38 IST

भाजपा नगरसेवक नारायण पवार यांचा खळबळजनक आरोप

ठाणे: सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका प्रशासनाच्या दृष्टिने अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्या नगरसेवकांचा आवाज ठाणे महापालिकेच्या वेबिनार महासभेत ‘म्यूट’ केला जात होता, असा खळबळजनक आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना आदेश देणाऱ्या पदाधिकारी अथवा अधिकाऱ्याचे नाव जाहीर करावे. तसेच महासभांच्या कामकाजाचा व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करावा, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.महापालिकेची दुसरी वेबिनार महासभा 18 सप्टेंबर रोजी पार पडली. यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या वेबिनार सभेप्रमाणोच या सभेचेही कामकाज अनाकलनीय होते. या सभेत काही ठराविक नगरसेवकांचा आवाज पद्धतशीरपणो म्यूट केला गेला. एखादा मुद्दा अडचणीचा असल्याचे वाटल्यानंतर, संबंधित विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा आवाज बंद केला जात होता. सभेचे अध्यक्ष महापौर नरेश म्हस्के यांनी याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी त्यांच्याकडे पवार यांनी केली आहे.कोरोना केंद्र आणि क्वारंटाईन सेंटरसाठी केलेल्या अनिर्बंध खरेदीविरोधात महासभेत प्रशासनाला विचारणा करण्यात येणार होती. हा मुद्दाही मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पद्धतशीरपणो आवाज ‘म्यूट’ (कमी) केला. अवाजवी दराने केलेल्या खरेदीला आपला आशिर्वाद असल्याचे समजायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.या महासभेवेळी आवाज कमी करण्याचे अधिकार असलेल्या आयटी विभागातील कर्मचा:यांची चौकशी करावी. महासभेचा व्हिडिओ महापालिकेच्या वेबसाईटवर टाकल्यास ठाणोकरांनाही सत्ताधारी शिवसेना व महापालिका प्रशासनाची मनमानी समजू शकेल, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.लपवाछपवी सुरूठाणे शहराच्या प्रारुप विकास आराखडय़ासाठी शेतकरी व भूमिपूत्रंच्या जमिनी घेतल्या. या आराखडय़ाला राज्य सरकारने 1999 मध्ये प्रथम तर त्यातील काही भागाला 2003 मध्ये मान्यता दिली. आराखडय़ाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संपूर्णत: महापालिका प्रशासनाची होती. मात्र, त्याची दहा टक्केही अंमलबजावणी झाली नाही. या विषयासंदर्भात गेल्या 17 वर्षांत झालेल्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र, आमचे म्हणणो ऐकूण घेतले नाही. विकास न झालेल्या भूखंडांचा शेतकरी वा भूमिपूत्रांनी पुन्हा ताबा मागितल्यास त्याची जबाबदारी प्रशासन स्वीकारणार आहे का? आराखडयाच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यास लपवाछपवी सुरू आहे, असाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका