शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, शिंदे गट एकत्रित निवडणुका लढवणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 07:59 IST

भिवंडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा

भिवंडी : राज्यभरात हाेणाऱ्या आगामी महापालिका निवडणुका भाजप बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या गटासोबत युती करून एकत्रित लढविणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला.

बावनकुळे शुक्रवारी पक्षाच्या आढावा दौऱ्यासाठी भिवंडीत आले हाेते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माधवी नाईक, भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आमदार महेश चौघुले, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, सुमित पाटील उपस्थित होते. त्याआधी त्यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवादही साधला. आजपासून तीन दिवस ठाणे जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या सत्ताकाळात काहीच काम केले नाही. आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे युतीचे सरकार चांगले काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष चुकीची माहिती पेरून सरकारची प्रतिमा खराब करीत आहे. खोटे सांगाल तर भाजपची संघटना रस्त्यावर उतरून विरोध करेल. तसेच येत्या काळात भिवंडी शहराला भरीव विकास निधी मिळवून देण्यासाठी आपण व्यक्तिशः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहोत.

‘अंधारे यांनी आपली उंची पाहून टीका करावी’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपली उंची पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करावी, अशी टीका बावनकुळे यांनी केली. तसेच राज्य सरकारचे समर्थक असलेले आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात भाजप पडणार नाही. मात्र, त्यांनी रस्त्यावर भांडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे