शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मीरारोडच्या चित्रकार प्रिया पाटील यांना बिर्ला फाऊंडेशनचा पुरस्कार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 19:11 IST

संसाराच्या रहाटगाड्यातुन आपल्यातील चित्रकलेला पुन्हा जागवणारया मीरारोडच्या प्रिया प्रमोद पाटील यांना दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२५ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात राजश्री बिर्ला फाउंडेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मीरारोड - संसाराच्या रहाटगाड्यातुन आपल्यातील चित्रकलेला पुन्हा जागवणारया मीरारोडच्या प्रिया प्रमोद पाटील यांना दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२५ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात राजश्री बिर्ला फाउंडेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या पिचवाई शैलीतील कामधेनू या चित्रास राष्ट्रीय स्तरावरील भारतिय चित्रशैली प्रकारात हा सन्मान मिळाला आहे.प्रिया पाटील ह्यांनी साकारलेल्या अनेक चित्रशैलींना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पाटील ह्या त्यांच्या सारख्याच संसारात गुरफटुन आपली उपजत कला हरवुन बसलेल्या महिलांसाठी चित्रांगना नावाने चित्रकलेचे प्रदर्शन गेल्या काही वर्षां पासुन आयोजित करत आहेत.मुंबईच्या जहांगीर कला दालनात पार पडलेल्या एका कार्यक्रमात ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी व्यंगचित्रकार तथा मनसे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ चित्रकार अनिल नाईक, चित्रकार सुहास बहुलकर, शिल्पकार इंद्रजित यादव आदींसह देशासतील नामवंत चित्रकार उपस्थित होते.पिचवाई हा भारतीय चित्रशैलीचा प्रकार असून आज राजस्थानच्या लोककलेचा हा एक भाग आहे. परंतु याचं मूळ हे महाराष्ट्रातील औरंगाबादजवळ वेरूळ येथे आढळून आले. अठराव्या शतकात महाराष्ट्रातील पिचवाई शैलीतील चित्रकार हे राजस्थानात स्थलांतरित झाले होते. पिचवाई या शब्दाचा अर्थ पाठीमागे अडकवले जाणारे असा होतो. या शैलीतील चित्र हे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या मागे आरास म्हणून लावले जाते असे पाटील यांनी सांगीतले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरartकला