बनावट कागदपत्राद्वारे बनवले गाळ्याचे बक्षिसपत्र; आईची मुलांकडून फसवणूक, गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: June 17, 2023 16:43 IST2023-06-17T16:41:25+5:302023-06-17T16:43:42+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-३, पवई चौक परिसरात निलम शिवनंद शहा या वृद्ध महिला राहतात.

Bill of lading made by forged document; Cheating of mother by children, case registered | बनावट कागदपत्राद्वारे बनवले गाळ्याचे बक्षिसपत्र; आईची मुलांकडून फसवणूक, गुन्हा दाखल

बनावट कागदपत्राद्वारे बनवले गाळ्याचे बक्षिसपत्र; आईची मुलांकडून फसवणूक, गुन्हा दाखल

उल्हासनगर : बनावट कागद पत्राद्वारे आईच्या नावावरील व्यापारी गाळा स्वतःच्या नावाने करण्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मुलासह एका साथीदारावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, पवई चौक परिसरात निलम शिवनंद शहा या वृद्ध महिला राहतात. त्यांच विभागातील जगदीश अपार्टमेंट इमारती समोर ९० चौरस मीटरचा व्यापारी गाळा त्यांच्या नावावर आहे. त्यांचा मुलगा सतीश शिवनंद शहा याने साथीदार श्रीकृष्ण मानकर यांच्या सोबत संगनमत करून १ एप्रिल २०२३ रोजी एका १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सतीश शहा यांच्या नावाने बनावट कागदपत्राद्वारे नोटरीकडून बनावट बक्षीसपत्र बनविले. त्यावर आईचा बनावट अंगठा घेतला.

दरम्यान याबाबतचा प्रकार उघड झाल्यावर आई नीलम शहा यांनी शुक्रवारी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून मध्यवर्ती पोलिसांनी नीलम शहा यांच्या मुलगा सतीश शहा व श्रीकृष्ण मानकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Bill of lading made by forged document; Cheating of mother by children, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.