शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रेसिंगच्या नादात दुचाकीस्वाराने गमावला जीव; अंबरनाथच्या लोकनगरी बायपासवर अपघात

By पंकज पाटील | Updated: February 10, 2024 20:17 IST

अंबरनाथमधील  प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास  रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

अंबरनाथ : अंबरनाथचा लोकनगरीत बायपास हा सध्या वाहन चालकांना स्टंट करणारा रस्ता वाटू लागला आहे. असाच एक बाईक स्वार आपल्या मित्रांसह भरधाव वेगात रेसिंग करत असताना त्याची बाईक थेट डिव्हायडरला धडकल्याने मोठा अपघात घडला आणि त्यात त्या बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झाला.        

अंबरनाथमधील  प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास  रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. विशाल वर्मा आणि त्याचा मित्र ताहा शेख हे त्यांच्या दुचाकीवरून भरधाव वेगात आपल्या मित्रांच्या दुचाकी सोबत रेसिंग करत होते. लोकनगरी बायपास रस्ता हा मोकळा असल्यामुळे त्यांच्या गाड्यांचा वेग अति होता. मात्र त्यावेळेस विशाल वर्मा याचा दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने तो शेजारी असलेल्या डिव्हायडरला धडकले त्यात विशाल वर्मा याचा जागीच मृत्यू झाला. तर शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

गेल्या वर्षभरात या लोकनगरी बायपासवर अनेक अपघात घडले असून रस्ता मोकळा मिळत असल्यामुळे अनेक वाहन चालक या ठिकाणी अति वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे या वेगवान वाहनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे. महिन्याभरापूर्वी या ठिकाणी एका चार चाकी कारला देखील असाच अपघात घडला होता. वाढत्या अपघातांच्या घटनेमुळे लोकनगरी बायपास हा मृत्यूचा बायपास होत आहे की काय अशी चर्चा शहरात निर्माण झाली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातbikeबाईकDeathमृत्यू