शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

भाईंदरच्या मुख्य रस्त्यावर पडले जीवघेणे भगदाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 20:31 IST

भाईंदर पूर्व येथील मुख्य रस्त्याला पडलेल्या भगदाड मुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनी ते भगदाड दगड लावून तात्पुरते झाकले .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर पूर्व येथील मुख्य रस्त्याला पडलेल्या भगदाड मुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनी ते भगदाड दगड लावून तात्पुरते झाकले . परंतु अपघाताची भीती कायम असल्याने नंतर खडी टाकून खड्डा तूर्तास भरण्यात आला आहे .  ह्या भगदाड मुळे मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभाराची लक्तरे पुन्हा फडकू लागली आहेत . 

भाईंदर पूर्वेस स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ह्या मुख्य नाक्या पासून भाईंदर पूर्व फाटक कडे येणारा वर्दळीचा मुख्य रस्ता आहे . सदर डांबरी रस्त्याच्या फाटक कडे येणाऱ्या मार्गिकेवर डांबरी रस्ता तुटून भगदाड पडले . दिवसरात्र ह्या रस्त्यावर वाहने धावत असल्याने वाहन चालकांना हा खड्डा चुकवून वाहन चालवणे अतिशय जोखमीचे झाले आहे . येथून पादचाऱ्यांची ये - जा असल्याने त्यानं या सुद्धा जीव मुठीत ठेऊन रस्त्यावरचे वाहन आणि खड्डा वाचवून चालावे लागतेय . ह्या महत्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावरच भगदाड पडल्याने नागरिकां मध्ये महापालिकेच्या कामाच्या दर्जा बाबत संताप व्यक्त होत आहे . 

डांबरी रस्त्याला पडलेले भगदाड पहिले असता रस्त्यावर डांबर काम करताना डांबर व खडी आदी पुरेशी टाकलीच नाही असे दिसते . कारण भगदाड पडले आहे त्या ठिकाणी खाली गटाराचा तुटका स्लॅब, सळ्या व खाली खड्डा तसेच केबल दिसत आहे . सदर प्रकार वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यावर सहायक निरीक्षक मंगेश कड व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या भगदाडवर मोठा दगड ठेवला आहे . परंतु वाहनांची वर्दळ व वेग पाहता हा खड्डा धोकादायक ठरू शकतो असे वाहन चालकांनी म्हटले आहे . 

शुभम साळस्कर ( नागरिक ) - भर रस्त्यावर पडलेले हे भगदाड पहिले कि महापालिका जनतेच्या पैशातून निकृष्ट कामे करून जनतेच्याच जीवाशी खेळत आहे . परंतु ह्यावर कोणी नगरसेवक व नेता अवाक्षर काढत नाही. जनतेसाठी निकृष्ट रस्ते व ह्यांचे मात्र आलिशान इमले अशी गेल्या काही वर्षात शहराची अवस्था झाली आहे . 

मंगेश कड ( सहायक निरीक्षक , वाहतूक पोलीस ) - रस्त्या खाली गटार असून केबल गेल्या आहेत . तेथे खड्डा पडल्याने अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी दगड लावले व मेट्रोचे काम करणार ठेकेदार जे . कुमार , महापालिका व अदानी वीज कंपनीस कळवले . आता त्या ठिकाणी खडी टाकून खड्डा भरला आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर