शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By अजित मांडके | Updated: August 19, 2022 15:14 IST

गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.

ठाणे : 

गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यापुढे उत्सव जोरात साजरे करा पण काळजी घेऊन करा, असे आवाहनही त्यांनी केले.

"आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं...", CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना?, अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. शिंदे पुढे म्हणाले, गोविंदाचा विमा पण दिला, सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी  खेळाच्या दर्जाची मागणी केली होत ती मान्य करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल आणि नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टेंभी नाका म्हणजे गोविंदाची पांढरी आहे. आनंद दिघेंनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम दिघे यांनी केले. आंनद दिघे बोलले होते की ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यांच्या बहिनीने माझ्याजवळ दिघेसाहेबांची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांची एवढी दूरदृष्टी होती आणि दिघे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. या उत्सवात सहाभागी झालो हे सर्वसामान्याचं सरकार आहे. उत्सव काळजी घेऊन साजरी करा. साथीचे आजार अजून गेले नाहीत काळजी घ्या. गणपती उत्सव देखील मोठया उत्सवात साजरे झाले पाहिजे, दोन वर्षे थांबलो. हा सण सर्वात मोठा सण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने साधला मराठीत संवाद..टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मनाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावल्याने मला अभिमान असल्याचे तिने सांगितले. या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावल्याने आपल्या सोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने याचा विशेष आनंद असल्याचे तिने सांगीतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरळ स्टेजवर न जाता त्यांनी गोविंदशीही संवाद साधला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShraddha Kapoorश्रद्धा कपूरDahi Handiदहीहंडी