ठाणे : उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत रविवारी त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे उद्धवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिणी बैरीशेट्टी निवडून आल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उद्धवसेनेसोबत राहणे पसंत केले होते. बैरीशेट्टी यांच्यासह युवासेनेचे ओवळा-माजिवडा चिटणीस सागर बैरीशेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.