गेल्या महिन्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपाने एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिंदेसेनेला मोठा धक्का दिला होता. अंबरनाथ आणि बदलापूरचं नगराध्यक्षपद जिंकत भाजपाने या दोन्ही शहरातील शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व संपुष्टात आणलं होतं. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांना शह काटशह देणाऱ्या खेळी सुरू झाल्या असून, आज भाजपाने बदलापूरमधील शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांना भाजपामध्ये घेत एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेला मोठा धक्का दिला आहे.
प्रवीण राऊत यांनी शिंदेसेनेकडून नगर परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर प्रवीण राऊत यांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. निवडणुकीत पराभव झाला असला तरी आपल्याला शिंदेसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपद मिळेल, अशी अपेक्षा प्रवीण राऊत यांना होता. मात्र स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याने ते नाराज झाले होते. तसेच तेव्हापासूनच ते शिंदेसेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
अखेरीस आज प्रवीण राऊत यांनी आज मुरबाडचे आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. प्रवीण राऊत यांच्यासोबत शिंदेसेनेच्या नगरसेविका दीपाली लामतुरे आणि त्यांच्या पतीनेही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, प्रवीण राऊत यांच्यासोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्याने हा बदलापूरमधील शिंदेसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच भाजपामधील प्रवेशानंतर प्रवीण राऊत यांना स्वीकृत नगरसेवकपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : In Badlapur, BJP gains strength as Shinde Sena's deputy chief and a corporator join the party. This is seen as a significant setback for Eknath Shinde's faction in the region, especially after recent Nagar Parishad election results.
Web Summary : बदलापुर में, भाजपा को मजबूती मिली क्योंकि शिंदे सेना के उप प्रमुख और एक पार्षद पार्टी में शामिल हो गए। यह क्षेत्र में एकनाथ शिंदे गुट के लिए एक महत्वपूर्ण झटका माना जा रहा है, खासकर हाल के नगर परिषद चुनाव परिणामों के बाद।