उल्हासनगर येथील पाच दुकान रस्त्याचे भूमिपूजन

By सदानंद नाईक | Updated: April 16, 2023 18:33 IST2023-04-16T18:33:24+5:302023-04-16T18:33:36+5:30

उल्हासनगर येथील पाच दुकान रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. 

Bhoomipujan of five shop road in Ulhasnagar | उल्हासनगर येथील पाच दुकान रस्त्याचे भूमिपूजन

उल्हासनगर येथील पाच दुकान रस्त्याचे भूमिपूजन

उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील पाच दुकान परिसरातील रस्ता दोन कोटीच्या निधीतून बांधण्यात येणार आहे. रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश सचिव सोनिया धामी यांच्या हस्ते झाले असून यावेळी सभागृहनेते भारत गंगोत्री उपस्थित होते.

उल्हासनगर कॅम्प नं-४ व ५ परिसरातील रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे महापालिका सभागृहनेते भारत गंगोत्री यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून २५ कोटीचा निधी मिळविण्यात यश मिळविले. या निधीतून भाटिया चौक, नेताजी गार्डन, स्मशानभूमी रस्ता, पाच दुकान परिसर रस्त्याची पुनर्बांधणी केली. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ कोटीच्या निधीतून पाचदुकान ते मंदिर रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश सचिव सोनिया धामी यांच्या हस्ते झाले. यावेळी पक्षाचे महापालिकेचे माजी सभागृहनेते भारत गंगोत्री, पक्ष पदाधिकारी माधव बगाडे यांच्यासह स्थानिक नागरिक व पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भारत गंगोत्री यांनी २५ कोटीच्या निधीतून झालेल्या रस्ते कामाची माहिती दिली.

 

Web Title: Bhoomipujan of five shop road in Ulhasnagar