उल्हासनगरात विविध विकास कामाचे भूमिपूजन

By सदानंद नाईक | Updated: May 5, 2023 19:33 IST2023-05-05T19:31:20+5:302023-05-05T19:33:14+5:30

ऐन पावसाळ्यात परिसरातील रस्ते व नाले यांची दुरुस्ती होणार आहे.

bhoomi pujan of various development works in ulhasnagar | उल्हासनगरात विविध विकास कामाचे भूमिपूजन

उल्हासनगरात विविध विकास कामाचे भूमिपूजन

सदानंद नाईक, उल्हासनगर : सामाजिक न्याय विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या १ कोटी निधीतून कॅम्प नं-५ येथील रस्ते व नाल्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार किणीकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, बाळा श्रीखंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

उल्हासनगर काम नं-५ येथील लेप्रसी कॉलनी, कैलाश नगर, महात्मा फुलेनगर, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा परिसर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खदान परिसरातील रस्त्याचे कॉक्रिटीकरण व नाल्याचे बांधकाम या निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती आमदार बालाजी किणीकर यांनी दिली. शुक्रवारी “बुद्ध पौर्णिमेचे” औचित्य साधून या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ऐन पावसाळ्यात परिसरातील रस्ते व नाले यांची दुरुस्ती होणार आहे. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, परशुराम पाटील, बाळा श्रीखंडे, आदिनाथ कोरेडे, विकास पाटील, अनिल मराठे, विलास काकडे, गणेश शिंदे, गणेश चौगुले, केशर लोणारे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: bhoomi pujan of various development works in ulhasnagar