भूत उतरवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:46 IST2021-09-21T04:46:23+5:302021-09-21T04:46:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : एका १६ वर्षीय पीडितेला तुझ्या मृत काकाचे भूत तुझ्या मानगुटीवर बसले आहे, अशी ...

Bhondubaba rapes a minor girl under the pretext of exorcism | भूत उतरवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार

भूत उतरवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : एका १६ वर्षीय पीडितेला तुझ्या मृत काकाचे भूत तुझ्या मानगुटीवर बसले आहे, अशी भीती घालून भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार केला. पूजापाठ आणि तंत्रमंत्रविद्या करून भूत काढले, तरच तुझी दुखत असलेली मान ठीक होईल, असा बहाणा करून अल्पवयीन पीडितेला भोंदूबाबाने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नारपोली पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सो कायद्यासह महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या. शांताराम जिवड्या शेळके (वय ६१, रा. भिवंडी) असे भोंदूबाबाचे नाव आहे. तर, या गुन्ह्यात भोंदूबाबाला मदत केल्याप्रकरणी पीडितेची आई (वय ३४) व आईचा साथीदार (वय ३५) या दोघांनाही अटक केली.

पीडित मुलगी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबासह राहत असून दोन वर्षांपूर्वी तिच्या काकाचे निधन झाले. तेव्हापासून पीडित मुलीची मान वाकडी होऊन दुखत होती. त्यामुळे पीडितेच्या आईने तिच्यावर दोन रुग्णालयांत उपचार केले. मात्र, मानेचा त्रास कमी होत नव्हता. पीडितेच्या आईचा साथीदार उमेश हा पीडितेच्या घरी येऊन आपल्या ओळखीच्या तांत्रिक बाबाकडे चलण्याचा आग्रह करीत होता. त्यामुळे आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित मुलगी आरोपी उमेशसोबत जुलै २०२० रोजी दुचाकीवरून भोंदूबाबाकडे गेली.

भोंदूबाबाने पीडित मुलीला तुझ्या मृत काकाचे भूत तुझ्या मानगुटीवर बसले आहे, असे सांगून तंत्रमंत्रविद्या करण्याकरिता रात्री जंगलात नेले. उमेशला भोंदूबाबाने रस्त्यावरच थांबवून पीडितेला तो जंगलातील एका झाडाखाली घेऊन गेला. तुझी आरती करायची असल्याचे सांगून विवस्त्र केले.. त्यानंतर भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. आई व उमेश यांनीही पीडितेला धमकी दिली. पीडितेने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेला घडला प्रकार सांगितला. तिने या मुलीसोबत नारपोली पोलीस स्टेशन गाठले. अखेर, भोंदूबाबावर कारवाई झाली.

............

वाचली

Web Title: Bhondubaba rapes a minor girl under the pretext of exorcism