शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

मीरारोडमध्ये भोजपुरी चित्रपट कलाकाराची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 8:28 PM

रविवारी रात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी दोन कारणे दिली आहेत. 

मीरारोड - दूरचित्रवाहिनी मालिका आणि भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या कलाकार अनुपमा पाठक ( 40) यांनी रविवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पाठकने दोन कारणांनी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. अनुपमा ह्या काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील ठाकूर मॉलसमोर एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील घरात त्या राहत होत्या. रविवारी रात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी दोन कारणे दिली आहेत. 

मनीष झा याने अनुपमा यांची दुचाकी मे महिन्यात त्या गावी गेल्या असता वापरण्यास नेली होती. परंतु अनुपमा परत आल्यानंतर मात्र मनीष त्यांची दुचाकी परत करत नव्हता. तर एका परिचिताचे 10 हजार रुपये अनुपमा यांनी मालाडच्या विस्डम प्रोड्युसर कंपनीमध्ये गुंतवले होते. त्याची मुदत डिसेंबर 2019 रोजीच पूर्ण झालेली असताना कंपनीने पैसे परत करण्यास चालढकल चालवली होती असे चिठ्ठीत म्हटले आहे. अनुपमा यांनी 1 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री आपला 10 मिनिटांचा व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला होता. त्यामध्ये देखील त्यांनी स्वतःला आलेला वाईट अनुभव  कथन करत कोणावर विश्वास ठेवू नका, असे सांगितले होते. त्यांनी आपल्या वेदना व्यक्त करत मृत्यू झाल्यावर काय काय बोलले जाते हे मांडले होते. लोकांवरचा विश्वास उडून गेल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान अनुपमा यांच्या आत्महत्येप्रकरणी मिळालेल्या चिठ्ठी नुसार काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.