केंद्र सरकारने कृषी कायदे माघारी घेतल्याने भिवंडीत युवक काँग्रेसने केला आनंदोत्सव साजरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 08:21 PM2021-11-19T20:21:32+5:302021-11-19T20:21:47+5:30

केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायद्यास सुरवाती पासून शेतकऱ्यांसह अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला तर दिल्ली च्या सीमेवर अनेक शेतकरी तब्बल एक वर्ष आंदोलन करीत होते .

Bhiwandi Youth Congress celebrates as Central Government withdraws agriculture laws | केंद्र सरकारने कृषी कायदे माघारी घेतल्याने भिवंडीत युवक काँग्रेसने केला आनंदोत्सव साजरा 

केंद्र सरकारने कृषी कायदे माघारी घेतल्याने भिवंडीत युवक काँग्रेसने केला आनंदोत्सव साजरा 

Next

नितिन पंडीत
भिवंडी ( दि. १९ ) केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायद्यास सुरवाती पासून शेतकऱ्यांसह अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला तर दिल्ली च्या सीमेवर अनेक शेतकरी तब्बल एक वर्ष आंदोलन करीत होते .शुक्रवारी सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्या बाबतची घोषणा केल्या नंतर शेतकरी संघटनां सह विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा विजय असल्याचे जाहीर करीत आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली असून भिवंडीत युवक काँगस अध्यक्ष राहुल छगन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी आनंद साजरा करण्यात आला यावेळी काँगस पदाधिकारी रेहाना अन्सारी ,इकबाल सिद्दीकी ,रेहान खान व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
           
भिवंडीत काँग्रेस युवक अध्यक्ष राहुल छगन पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत फटाके फोडून कार्यकर्त्यांसह रिक्षा मधील प्रवाशांना पेढे भरवून आनंद साजरा केला आहे.हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा,लोकशाहीचा असल्याचे सांगत मोदींच्या हिटलरशाहीचा हा पराभव असून शेतकऱ्यांच्या लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाचा हा विजय असून ज्या प्रमाणे दिल्ली सीमेवरील बॅरिकेट्स हटविणे भाग पडले त्या प्रमाणे काळे कायदे हटविण्याची वेळ मोदी सरकारवर येईल ही राहुल गांधी यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची प्रतिक्रिया भिवंडी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल छगन पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Bhiwandi Youth Congress celebrates as Central Government withdraws agriculture laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.