शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पंचायत सभापतीच्या पतीसह नऊ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 18:26 IST

निलेश गुरव हा भिवंडी पंचायत समिती सभापतींचा पती असून भाजपचा कार्यकर्ता असल्याने राजकीय वरदहस्तामुळेच त्याला अटक करण्यात येत नसल्याची प्रतिक्रिया श्रीकांत भोईर यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

भिवंडी - गुरचरण जागेच्या कब्जावरून झालेल्या वादातून पंचायत समिती सभापतींच्या पतीने दलित तरुणास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कवाड गावात रविवारी घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा सभापतीच्या पतीसह इतर ९ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रॉसीटीसह इतर कलमांन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असतांनाही घटनेच्या सहा दिवसांनंतरही तालुका पोलोसांनी आरोपीस अटक केलेली नसल्याने, दलित तारुणांसह त्याचे संपूर्ण कुटुंब भीतीच्या वातावरणात आहे. 

श्रीकांत नारायण भोईर ( वय ४० वर्ष रा. कवाड ) असे मारहाण झालेल्या दलित तरुणाचे नाव असून निलेश गुरुनाथ गुरव, असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. कवाड हद्दीतील गुरचरणमधील काही भागातील पडीक जमीन श्रीकांत भोईर याच्या कब्जा वहीवाटीस असून याठिकाणी सिमेंटचे खांब पुरण्याचे काम रविवारी सुरू होते यावेळी कवाड गावात राहणारे निलेश गुरव व त्याचे साथीदार जगदीश हाडके, बंटी पवार, चिन्मय कुंदेकर, यशवंत गुरव, गोविंद गुंजे, आकाश जाधव, दीपक जाधव, ललित भैय्या, असे नऊ आरोपी यांनी भोईर यांनी कब्जा जमिनीवर टाकलेले सिमेंट खांब पडून टाकले यावेळी झालेल्या वादात निलेश गुरव व त्याच्या साथीदारांनी श्रीकांत यास ठोशा बुक्यांनी व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत श्रीकांत जखमी झाला असून या मारहाणीची घटना शेजारील दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुरव व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या सहा दिवसांनंतरही आरोपी मोकाट असून पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

निलेश गुरव हा भिवंडी पंचायत समिती सभापतींचा पती असून भाजपचा कार्यकर्ता असल्याने राजकीय वरदहस्तामुळेच त्याला अटक करण्यात येत नसल्याची प्रतिक्रिया श्रीकांत भोईर यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाPoliceपोलिस