शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

भिवंडी जिलानी इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा 38 तर 25 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 5:17 PM

या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जण मृत तर 25 जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

नितीन पंडित 

भिवंडी-  शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथील तीन मजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत. दरम्यान काही मृतांच्या नाव व आडनावावरून मृतांच्या आकडेवारीत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत तफावत येत होती, बुधवारी सायंकाळी 41 मृतांची माहिती बचावकार्यासह मनपा प्रशासनाकडून मिळत होती. मात्र पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जण मृत तर 25 जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.दरम्यान, चौथ्या दिवशी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मृतदेहांची शोधमोहीम बचाव पथकाने थांबविली व त्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, श्वान पथक व बचाव पथकातील इतरांनी या इमारतीतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तर  या  दुर्घटनेत एका अडीच वर्षांचा मुसीफ शब्बीर कुरेशी या मुलाचा मृतदेह अजूनही मिळाला नसल्याने मुलाचे वडील शब्बीर कुरेशी हे गुरुवारी चौथ्या दिवशीदेखील आपल्या मुलाची वाट पाहत इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ थांबले होते. तर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांचे नातेवाईक आपल्या आप्त स्वकीयांची आठवण म्हणून या ढिगाऱ्यात काही मिळते का, यासाठी शोधाशोध करत होते.

दरम्यान या घटनेत 38 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा संपूर्ण तपास करण्यासाठी चार सदस्य चौकशी समिती नेमली असून येत्या सात दिवसांत समिती अहवाल देणार आहे. तत्पूर्वी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या प्रभाग तिचे प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना यापूर्वीच निलंबित केले असून, चौकशीनंतर या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर इमारत कोसळण्याचे नेमकी कारण काय याची देखील चौकशी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपाचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.