VIDEO: हातगाडीला बसची जोरदार धडक; फेरीवाला १० फूट लांब उडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 08:57 PM2021-01-04T20:57:01+5:302021-01-04T20:57:25+5:30

बसच्या मागील चाकाची धडक बसल्यानं फेरीवाला गंभीर जखमी

in bhiwandi hawker injured in accident after speedy bus hits his Handcart | VIDEO: हातगाडीला बसची जोरदार धडक; फेरीवाला १० फूट लांब उडाला

VIDEO: हातगाडीला बसची जोरदार धडक; फेरीवाला १० फूट लांब उडाला

Next

भिवंडी: भिवंडी शहरात कल्याण नाका ते वांजरपट्टी नाका मार्गावर रस्त्याचे कामे संथगतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग होत आहे. त्यातच सध्या शहरात मेट्रोचे रस्ता काँक्रिटकरणाचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

रविवारी सायंकाळच्या सुमाराला वांजरपट्टी नाका येथील पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने हातगाडी घेऊन जाणाऱ्याला समोरून येणाऱ्या फेरीवाल्याला बसच्या मागील चाकाची जोरदार धडक बसली. या धडकेत हातगाडी चालक १० फूट लांब फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला.  या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या घटनेच्या माहितीसाठी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता आमच्याकडे या घटनेची माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: in bhiwandi hawker injured in accident after speedy bus hits his Handcart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.