भिवंडी गुन्हे शाखेने केला पावणे अकरा लाखांचा गुटखा जप्त
By नितीन पंडित | Updated: August 29, 2022 18:50 IST2022-08-29T18:49:55+5:302022-08-29T18:50:44+5:30
गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार साबिर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी याठिकाणी छापा मारला.

भिवंडी गुन्हे शाखेने केला पावणे अकरा लाखांचा गुटखा जप्त
भिवंडी: गुन्हे शाखेच्या पथकाने भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी छापा मारून तब्बल १० लाख ७९ हजार ४४० रुपयांचा अवैध गुटखा पान मसाला जप्त केला आहे.या कारवाईने गुटखा माफियांमध्ये मोठी खळखळ उडाली आहे.
शहरातील विठ्ठल नगर येथील न्यू ग्लोबल कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेला मिळाली असता गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार साबिर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी याठिकाणी छापा मारला असता पावणे अकरा लाखांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.या अवैध गुटखा प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात मोहम्मद कमर मोहम्मद अरिफ अन्सारी व अहमद कमाल अहमद खान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.