भिवंडीत गुन्हे शाखेने साडेचार लाखाचे एम.डी केले जप्त; एक जण ताब्यात 

By नितीन पंडित | Updated: August 10, 2023 19:50 IST2023-08-10T19:49:47+5:302023-08-10T19:50:02+5:30

भिवंडी गुन्हे शाखेने रांजनोली नाका येथे केलेल्या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

Bhiwandi Crime Branch seized MD worth four and a half lakhs One person in custody | भिवंडीत गुन्हे शाखेने साडेचार लाखाचे एम.डी केले जप्त; एक जण ताब्यात 

भिवंडीत गुन्हे शाखेने साडेचार लाखाचे एम.डी केले जप्त; एक जण ताब्यात 

भिवंडी: भिवंडी गुन्हे शाखेने रांजनोली नाका येथे केलेल्या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेत त्याच्या जवळून १५.७८ ग्रॅम वजनाचा ४ लाख ५५ हजार रुपये किमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ बुधवारी जप्त केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना अमली पदार्थ विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने रांजनोली नाका येथील वाहतूक शाखा पोलीस चौकी पुढे सर्व्हिस रस्त्यावर सापळा रचून संशयित अस्लम अब्दुल कादीर समा वय ३८,रा.भूज गुजरात यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ  १५.७८  ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे.
 

Web Title: Bhiwandi Crime Branch seized MD worth four and a half lakhs One person in custody