शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

"भिडे हा समाजघातक किडा, त्याला वेळीच ठेचा"; आव्हाडांकडून अटकेची मागणी

By अजित मांडके | Published: July 31, 2023 7:18 PM

डॉ. आव्हाडांनी नोंदविली पोलीस ठाण्यात तक्रार

ठाणे : मनोहर भिडे हा खोटारडा माणूस आहे. तो सातत्याने महापुरुष, समाजसुधारकांच्या बाबतीत गरळ ओकत आहे. ज्यांचे विचार सबंध जगाने स्वीकारले. त्या महात्मा गांधी यांच्याबाबत हा काहीही बोलतो. भिडे सारख्या प्रवृत्ती या अफझल खानाचा वकील कृष्णा वकील याच्या औलादी आहेत.त्यामुळे  भिडे हा समाजघातक किडा असून त्याला वेळीच ठेचा, अशी मागणी करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनोहर भिडे याला अटक करण्याची मागणी केली. बुधवारपर्यंत भिडे याला अटक न केल्यास सभागृह चालू न देण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.    आव्हाड यांनी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन भिडे याच्या विरोधात रितसर लेखी तक्रार दाखल केली. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवाध्यक्ष विक्रम खामकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी मनोहर उर्फ संभाजी भिडे याचा बुरखा फाडला.  डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  मनोहर भिडे हे परवा महात्मा गांधी यांच्याबद्दल आणि काल महामानव महात्मा फुले यांच्याबद्दल गलिच्छ शब्दात टीपणी केली. ते ज्या भाषेत बोलले ती भाषा या देशाची संस्कृती नाही. दरवेळेस मुस्लीमांबद्दल बोलून त्यांना निष्कारण ओढून द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असतो. यापूर्वी ते पंडीत नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दलही बोलले होते. अनेक समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक यांच्याबाबत अत्यंत गलिच्छ शब्दात बोलणारा हा भिडे अकरावी पासही नाही. पण, आटोफिजीक्समध्ये काही तरी केलेय; फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होता, अशा गमजा मारुन त्याची प्रतिमा त्यांचे समर्थक तयार करीत आहेत. भिडे हा अfिशक्षीत, गलिच्छ, क्रूर वृत्तीचा माणुस आहे. जो माणूस महात्मा गांधींच्या चारित्र्याविषयी शंका घेतो, त्याला काय म्हणावे. एकतर तो ठार वेडा तरी असता; किंवा त्याला कोणी तरी सुपारी दिली असावी. नेमके बहुजन समाजाविषयीच तो का बोलतो? बहुजन समाजाविषयी त्याच्या मनात एवढा द्वेष का आहे? ज्या पद्धतीने तो याधीही तो बोलला आहे. या आधी सनातन प्रभात नावाच्या या लंगोटी वृत्तपत्राने फुले नावाची दुर्गंधी असे काही तरी छापले होते. ते सगळे एकत्र आहेत. माझा प्रश्न असा आहे की, शासनाला काहीच दिसत नाही? महात्मा फुले यांच्याबाबत तो इतका घाणेरडे बोललाय. की ज्यामुळे बहुजन समाजाला लाज वाटली पाहिजे; ज्यांचे विचार सबंध जगाने स्वीकारले. त्या महात्मा गांधी यांच्याबाबत हा काहीही बोलतो. जणूकाही त्यांना या देशात काही किमंतच राहिलेली नाही. ही सर्व पिढी आहे ती अफझल खानाचा वकील कृष्णा वकील याच्या औलादी आहेत. त्यांनी कायम महाराष्ट्राविरोधात भूमिका घेतली. जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात भूमिका घ्यायला घाबरले नाहीत; त्या लोकांविरोधात म्हणजेच कृष्णा कुलकर्णीच्या औलादींविरोधात आमची लढाई आहे.   ज्यातून कोणत्याही प्रकारचा धर्म- जाती संघर्ष निर्माण होईल, असे भाष्य कोणी केले तर त्याच्यावर भादंवि 153, 153 अ, 153 ब, 295 आणि 505 अन्वये पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. नागरत्न आणि न्या. जोसेफ यांच्या खंडपीठाने 28 एप्रिल 2023 रोजी दिले आहेत. मात्र, महाराष्ट्र पोलिसांना कोणी आदेशच देत नाहीत. तसेच, पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे काय करीत आहेत? का गेन्ह दाखल करीत नाहीत. हे सरकार भिडेला लपवू पहात आहे का? हे सरकार भिडे समर्थक आहे का? तसे त्यांनी जाहीर करावे. अन् जर हे सरकार भिडे समर्थक नसेल तर त्यांनी गुन्हे दाखल करावे. हे सरकार बहुजन- ओबीसी विरोधी आहे का? छोटÎा समाजाला भारतात- महाराष्ट्रात काही किमंत नाही, असेच झाले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपण महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहोत, असे सांगितले आहे. त्यांनी लिहिलेले संविधान तयार असताना हा किडा इतके बोलू शकतो;  ज्या लाखो लोकांची श्रद्धा साईबाबांवर आहे. त्या साईबाबांच्या मूर्ती फेकून देण्याचे आवाहन हा भिडे करीत आहे;  याचा अर्थ हे सरकार त्याच्या समर्थनार्थ उभे आहे. आमच्यापैकी कोणी असे म्हटले असते तर पोलिसांनी फरफटत नेले असते. साध्या- साध्या प्रकरणात आमच्या मुलांना तडीपार केले जाते. आम्ही लढायला तयार आहोत. एकीकडे असे घाणेरडे राजकारण करायचे आणि दुसरीकडे भिडेला वाचवायचे? या भिडेचे फोटो कोणाकोणाबरोबर आहेत; जे आज या सरकारमध्ये बसलेत! मुख्यमंत्री झाल्यावर कोण भेटायला गेलं होतं? बहुजन समाजाचा, ओबीसी समाजाचा अपमान होत असताना या भिडेला सरकार वाचवत आहे. भिमा-कोरेगाव पेटवले तेव्हाही त्याला सोडून देण्यात आले होते. आमची या सरकारला विनंती आहे की, आता तमाशे बंद करा. ओबीसी-बहुजन ऐकून घेताहेत म्हणून त्यांना पायाखाली चिरडायला जाऊ नका. आम्ही आता ऐकणार नाही. महात्मा गांधींचा अपमान हा त्यांच्या विचारांचा; त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा अपमान आहे. हा देश बुद्ध आणि गांधींचा आहे. असले वेडे चाळे करणाऱया माणसाला जेलमध्ये घालणार नसाल तर चुकून माकून आमच्याकडून एखादा गुन्हा घडू शकतो. अन् त्याची जबाबदारीही आम्ही घेऊ. एकीकडे आमच्या मुलांना तडीपार करता आणि दुसरीकडे भिडेला वाचवता?  

भिडेला तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. जर भिडेला येत्या बुधवारपर्यंत अटक केली नाही तर भिडेला अटक करण्यात आली नाही तर बुधवारी सभागृह चालू द्यायचे नाही, असे आवाहन आपण समस्त आमदारांना करीत आहोत. सरकारला जनभावनेचा आदर करावाच लागेल. शिवाय,  ज्यांचे महात्मा गांधींवर प्रेम आहे; ज्यांचे महात्मा फुले यांच्या योगदानावर प्रेम आहे; किंवा महिलांनाही आवाहन करतो की, आपापल्या समाजमाध्यमांमधून व्यक्त व्हा. अन्यथा, महिलांना पुन्हा त्या काळात जावे लागेल. ज्या काळात महिलांना उपभोग्य वस्तू म्हणून ओळखले जात होते. भिडे हा समाजघातक किडा असून त्याला वेळीच ठेचा.  

भिडे हा खोटारडा आहे

भिडे हा खोटारडा माणूस आहे. हा कसला प्राध्यापक वगैरे काही नव्हता. हा अकरावी पासही नाही. घरातून पळून गेलेला माणूस आहे. समाजासाठी याचे योगदान काय?  32 मण सोन्याचे सिंहासन बनविण्याच्या भूलथापा देऊन पैसे लाटायचे, असे याचे धंदे आहेत. हा नटसम्राट आहे. ही अफझल खानाचा वकील कृष्णा कुलकर्णीची औलाद आहे, असेही डॉ. आव्हाड म्हणाले.    

भिडेच्या सभेला परवानगी कशी मिळते?

भिडे एवढे प्रक्षोभक बोलतो; मुस्लीमांबद्दल, ओबीसी, बहुजन, महापुरुष यांच्याबद्दल हा इतके घाणेरडे बोलतो. तरीही त्याच्या सभेला परवानगी मिळते. यातच खरी गोम आहे. त्याला परवानगी मिळतेच कशी, याचा अर्थ काय? , असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला. मुह मे राम , पेट मे नथूराम, अशी भूमिका घेतली जात आहे. म्हणूनच भिडेला अटक केली जात आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPoliceपोलिस