शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
3
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
4
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
5
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
6
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
7
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
8
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
9
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
10
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
11
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
12
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
13
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
14
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
15
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
16
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
17
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
18
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
19
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
20
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

भाईंदर मेट्रोच्या कामाला १५ ऑगस्टपूर्वी प्रारंभ - प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 1:34 AM

गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीनंतर मीरा-भार्इंदर मेट्रोचे काम मंजूर होऊन पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले असले, तरी त्याचे काम मात्र अजून सुरू झालेले नाही.

मीरा रोड - गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीनंतर मीरा-भार्इंदर मेट्रोचे काम मंजूर होऊन पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले असले, तरी त्याचे काम मात्र अजून सुरू झालेले नाही. मेट्रोचे काम प्रत्यक्षात सुरू करावे, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असता एमएमआरडीएकडून १५ आॅगस्टपूर्वी कामाचा प्रारंभ होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.दहिसर पूर्वेला चेकनाक्यापर्यंत येणारी मेट्रो मीरा-भार्इंदरमध्ये यावी तसेच काशिमीरावरून ती ठाणे मेट्रोला जोडावी, अशी मागणी सरनाईक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून चालवली आहे. सरकार आणि एमएमआरडीएकडे सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करतानाच विधिमंडळाच्या अधिवेशनात आंदोलने, प्रश्न मांडले आहेत.मुख्यमंत्र्यांनीही २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मेट्रो मंजुरीचे आश्वासन दिले होते. पण, अंदाजपत्रकात नसलेली तरतूद आणि मेट्रोमार्ग जाहीर न केल्याने सरनाईक आदींनी निवेदनांसह याविरोधात होळी, दहीहंडी, दिवाळी आदी दिवशी आंदोलने केली होती. अखेर, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या अनेक प्रकल्पांच्या भूमिपूजनांमध्ये मीरा-भार्इंदर मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन उरकण्यात आले होते.शिवसेनेने मीरा-भार्इंदर मेट्रोची नुसती मागणीच नाही, तर त्याचा सतत पाठपुरावा केल्याने प्रशासकीय पातळीवर हे काम अंतिम टप्प्यात आले. मात्र, जागेवर मेट्रोचे काम सुरू होत नसल्याने विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.मेट्रोसाठी पाठपुरावा केला असून हा आपला तसेच शहरवासीयांच्या स्वप्नातील प्रकल्प असल्याने काम तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.कंत्राटदार निश्चित करणारमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानंतर एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोमार्गाचे काम करण्यासाठी १५ जुलैपर्यंत कंत्राटदार निश्चित करून १५ आॅगस्टआधी काम सुरू केले जाईल, अशी माहिती दिल्याचे आ. सरनाईक म्हणाले.

टॅग्स :Metroमेट्रो