राज्याच्या ‘तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार’ने भाऊसाहेब चव्हाण सन्मानीत
By सुरेश लोखंडे | Updated: February 16, 2025 19:13 IST2025-02-16T19:13:27+5:302025-02-16T19:13:34+5:30
ठाणे : आपल्या प्रशासकीय कामासाहेबत शैक्षणिक क्षेत्रात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभाविपणे राबविल्यामुळे शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण ...

राज्याच्या ‘तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार’ने भाऊसाहेब चव्हाण सन्मानीत
ठाणे: आपल्या प्रशासकीय कामासाहेबत शैक्षणिक क्षेत्रात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभाविपणे राबविल्यामुळे शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ‘तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार २०२४-२५’ या महत्वाच्या पुरस्काराने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतेकर यांच्या हस्ते संन्मानित करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाल्याचे शालेय स्तरावर बाेलले जात आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा करत असताना चव्हाण यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड, कळवण व नांदगाव या तालुक्यात व सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर या तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबविले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे महाराष्र्ट राज्य शिक्षक परिषदेचे ठाणे जिल्हा संघटक सुधीर भाेईर यांनी लाेकमतला सांगितले.
नरोतम सखसेरिया फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा 'तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार वितरण समारंभ मुंबई प्रेस क्लबच्या सभागृहात निवतेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी राज्याच्या आराेग्य विभागाचे सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, सहाय्यक संचालक रिटा परवडे, सलाम मुंबई फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिना रामचंद्रन, नरोतम सखसेरिया फाउंडेशनचे मनीष जोशी आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्यातील सहा व उत्तर प्रदेश राज्यातील एक अशा एकूण सात पुरस्कारार्थीना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारात सन्मानचिन्ह व २५ हजार रकमेचा धनादेशाचा समावेश आहे.