भातसा उजवा कालव्यावरील लोखंडी पूल तुटला

By Admin | Updated: November 17, 2016 07:33 IST2016-11-17T07:33:27+5:302016-11-17T07:33:27+5:30

शहापूर तालुक्यातील भातसा उजवा कालव्यावरील साजीवली गावानजीकचा लोखंडी पुल तुटुन पडला आहे.

Bhatasa, the iron bridge on the right canal collapsed | भातसा उजवा कालव्यावरील लोखंडी पूल तुटला

भातसा उजवा कालव्यावरील लोखंडी पूल तुटला

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा उजवा कालव्यावरील साजीवली गावानजीकचा लोखंडी पुल तुटुन पडला आहे. हा पूल ३० वर्षे जुना आहे. तो तुटल्याने साजीवली तेथे जाण्यासाठी व खास करून विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
भातसानंगर प्रकल्प विद्यालयात जाण्यासाठी हाच जवळचा मार्ग होता. हा लोखंडी पूल गंजला होता. तो बुधवारी अचानक कोसळला. भातसा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. सोनवणे यांनी त्याची पाहाणी केली. तेथे नव्याने पूल बांधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हा नवीन पूल बांधून होईतो नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. शिवाय, विद्यार्थ्यांचे हाल होत असून त्यावर लवकर काहीतरी तोडगा काढणे आवश्यक आहे. (वार्ताहर)

Web Title: Bhatasa, the iron bridge on the right canal collapsed