शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

स्वत: अनाथ असून अनेक मुलांना आधार देत ‘त्यांनी’ केले सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:43 AM

संस्थेत राहून मोठे झालेल्यांपैकी सुमारे २०-२५ मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत.

स्नेहा पावसकर ठाणे : स्वत: अनाथ असूनही कधी त्या गोष्टीचे भांडवल न करता उलट त्यातूनच प्रेरणा घेऊन समाजातील इतर अनाथ मुलांसाठी काम करण्यास पुढे सरसावून त्यांना सक्षम केले आहे, ते विरार येथील विजय सराटे यांनी. निराधार मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या कामात त्यांची पत्नी त्यांना पूर्ण सहकार्य करते. आज त्यांच्या संस्थेत ५६ हून अधिक निराधार मुले राहत आहेत. नारायण चंद्र ट्रस्टच्या माध्यमातून विरार येथे अनाथाश्रम चालवला जातो. विजय सराटे हे त्याचे डायरेक्टर आहेत. १४ वर्षे ते निराधार मुलांचे सर्वतोपरी पुनर्वसन करत आहेत. आज त्यांच्याकडे ६ ते १८ वयोगटांतील मुले-मुली आहेत. त्यांच्या पुढील शिक्षणासाठीही ते इतर संस्थांशी त्यांना जोडून देतात. संस्थेत राहून मोठे झालेल्यांपैकी सुमारे २०-२५ मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत.विजय यांनी उच्च शिक्षण घेऊन मास्टर्स आॅफ सोशल वर्क पदवी मिळवलेली आहे. मीना या अनाथ मुलीशीच त्यांनी विवाह केला आणि आज ते दोघेही अनाथ मुलांचे नाथ झाले आहेत. त्यांना दोन मुले असून तीसुद्धा अनाथाश्रमातील इतर मुलांमध्ये मिसळून राहतात. ट्रस्टच्या माध्यमातून महिलांचे वसतिगृह आणि वृद्धाश्रमही चालवला जात आहे. यातून येणाऱ्या मदतीतून मुलांसाठी अनाथाश्रम चालवल जातो. कोरोनाचे संकट उभे ठाकले असताना या सर्व मुलांची काळजी वाटते. परंतु, शाळा नसल्याने मुले अनाथाश्रमाच्या इमारतीतच असतात.बाहेरील व्यक्ती कोणीही तिथे जात नसल्याने मुलांना कोरोनाचा धोका नाही. तरीही, आम्ही वारंवार महापालिकेच्या माध्यमातून तसेच संस्थेच्या खर्चातून आश्रमाच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करून घेतो. तसेच कोरोनाबाबतची मुलांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी विविध खेळ, मनोरंजनात्मक छोटे कार्यक्रम मुलांसाठी तिथेच आयोजित करतो, असे विजय सराटे यांनी सांगितले.>मी स्वत: अनाथ असल्याने देवरूख येथील इंदिराबाई हळबे स्थापित मातृमंदिर या संस्थेतून माझे शिक्षण आणि पुनर्वसन झाले. उच्च शिक्षण घेऊन नोकरी करत असतानाही अनाथ मुलांसाठी काम करण्याचा विचार माझ्या डोक्यात होता. ट्रस्टच्या माध्यमातून मी हे काम करत असून या सर्व मुलांना मी आधार देऊ शकलो, याचे मला आत्मिक समाधान आहे.- विजय सराटे