शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव कार्यकर्ता झाल्याने संयम शिकलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 23:27 IST

माझी आजी मनोरमा दामले, माझे वडील मुकुंद दामले आणि माघी गणेशोत्सवाचे ३५ ते ४० वर्षे अध्यक्ष होऊन गेलेले गुरूनाथ ...

माझी आजी मनोरमा दामले, माझे वडील मुकुंद दामले आणि माघी गणेशोत्सवाचे ३५ ते ४० वर्षे अध्यक्ष होऊन गेलेले गुरूनाथ मुळे (गुरूनाथकाका) या तिघांचा आशीर्वाद लाभल्याने मी अनेक वर्षे हे काम करीत आहे. या उत्सवाच्या व्यासपीठावरून निवेदनाला तसेच गायन कार्यक्रमांना सुरुवात केली. पुढे स्वसंचालित ‘स्वरगंगेच्या काठावरती’, ‘अक्षयगाणी’, ‘वसंत बहार’, ‘निशीगंध’, ‘स्वर आले दुरूनी’ या व्यावसायिक कार्यक्रमांत गायक म्हणून अनेक दिग्गज कलाकारांकडून वाहवा मिळवली. आजही ते चालू आहे. याशिवाय, अनेक स्पर्धांमधून (वक्तृत्व व गायन) पारितोषिके मिळवली. दूरदर्शनवरही अनेक कार्यक्रमांत सहभागी झालो.

या सर्वांचे शिक्षण या गणेशोत्सवाच्या व्यासपीठावरून काम करताना घेतले. उदय सबनीस व सोनिया परचुरे हे दोघेही याच उत्सवाच्या माध्यमातून यश संपादन केलेले कलाकार. याशिवाय, भारतीय नववर्ष स्वागतयात्रा, सन्मित्र मंडळ- ठाणे, प्रल्हाद पुस्तकपेढी- नौपाडा विकास मंच- ठाणे, स्वा. सावरकर सेवा संस्था- ठाणे या संस्थांमध्ये अनेक पदे भूषविली आणि आजही कार्यरत आहे. आनंद विश्व गुरुकुल या शैक्षणिक संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत आहे. हे सर्व याच गणेशोत्सवात कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळे मिळालेले यश असे मी मानतो. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांचा ठाण्यात कार्यक्रम होता. तेव्हा अलीकडेच निधन झालेले योगाचार्य अण्णा व्यवहारे यांनी माझी ओळख आमटे यांना करून देताना असे उद्गार काढले की, ‘प्रकाशजी, विश्वास दामलेंची ओळख एका वाक्यात करूरुन द्यायची, तर ती म्हणजे ठाण्यातील सर्व सामाजिक संस्थांना हवाहवासा वाटणारा उत्तम कार्यकर्ता’ आणि हीच माझ्या उत्तम कामाची पावती होती. पहिल्या महायुद्धात फ्रान्सने वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा पाडाव केल्यानंतर ड्युक आॅफ वेलिंग्टन असे म्हणाला होता की, ‘बॅटल आॅफ वॉटरलू वॉज वोन आॅन द प्लेइंग फिल्ड्स आॅफ एटन’ म्हणजेच, या लढाईतल्या विजयासाठी आवश्यक असलेली एकी आणि जिंकण्याची भावना ही एटनच्या मैदानावर फुटबॉल खेळताना आमच्यात विकसित झाली होती. याचप्रमाणे आज वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये व्यापकस्तरावर काम करण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव, ज्ञान, बाळकडू ही शिदोरी गणेशोत्सवात लहानपणापासून सामान्य कार्यकर्ता या भावनेतून केलेल्या कामातून मला मिळाली.

आजही या उत्सवात काम करीत असल्याचा मला फायदा होत आहे. यशाची किंवा मानसन्मानाची धुंदी मला कधीच चढली नाही. आजच्या तरुण कार्यकर्त्यांबरोबर तितक्याच सहजपणे काम करता येते. त्यामुळे तारुण्य अबाधित राहत मोठमोठ्या मॅनेजमेंट ट्रेनिंग कोर्सेसमध्ये मिळणारे ज्ञान सहजपणे या उत्सवात शिकायला मिळते. लहानपणापासून या उत्सवात मी सतरंज्या उचलण्यापासून काम केले. आजही पडेल ते काम करण्याची माझी तयारी असते. या उत्सवात सामाजिक समरसता प्रत्यक्षात अनुभवायला मला मिळाली, आजही मिळते. सर्व विषयांकडे पाहण्याची सर्वसमावेशक वृत्ती विकसित झाली. सगळ्यांना सांभाळून घेण्याची कला गणेशोत्सवातूनच शिकलो. संयमी वृत्ती अंगी आली व कुठल्याही प्रश्नावर तोडगा काढण्याची सवय लागली.(कार्याध्यक्ष, नौपाडा सार्वजनिक गणेशोत्सव, ठाणे)- शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रेसुरुवातीला काही वर्षे भाद्रपद महिन्यात साजरा होणारा नौपाडा सार्वजनिक गणेशोत्सव (स्थापना १९३१) काही वर्षांनंतर सर्वसहमतीने माघ महिन्यात उमा-नीळकंठ व्यायामशाळेच्या मैदानात सुरू झाला. माझा जन्म १९५९ मधील. साधारणपणे १९७२-७३ सालापासून म्हणजेच आठवी-नववीत असतानाच या उत्सवाचा कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो. पुढे सेक्रेटरी झालो व गेली २५-३० वर्षे कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे.विश्वास दामले

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019thaneठाणे