२८ व्या मजल्यावरील बेडरूम जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:21 IST2018-04-30T03:21:32+5:302018-04-30T03:21:32+5:30

घोडबंदर रोड, पातलीपाडा परिसरातील हिरानंदानी इस्टेटमधील बास्कील्लुस या इमारतीच्या २८ व्या मजल्यावरील सुनीता सेठ यांच्या घराच्या बेडरूमला रविवारी दुपारी आग लागली.

The bedroom on the 28th floor burned out | २८ व्या मजल्यावरील बेडरूम जळून खाक

२८ व्या मजल्यावरील बेडरूम जळून खाक

ठाणे : घोडबंदर रोड, पातलीपाडा परिसरातील हिरानंदानी इस्टेटमधील बास्कील्लुस या इमारतीच्या २८ व्या मजल्यावरील सुनीता सेठ यांच्या घराच्या बेडरूमला रविवारी दुपारी आग लागली. यामध्ये सध्या न वापरण्याचे बेडरूममधील सर्व सामान जळून खाक झाले असून आगीचे कारण समजू शकलेले नाही.
रविवारी सकाळी सेठ या जिममध्ये गेल्या असताना हॉलची साफसफाई करणाऱ्या महिलेला बेडरूममधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. तिने सेठ यांना सांगितले. त्यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. आग विझवेपर्यंत त्या बेडरूममधील सर्व सामान जळून खाक झाले होते. इमारतीमध्ये आग लागल्याचे कळताच, इमारतीतील रहिवाशांनी तत्काळ खाली धाव घेतली. ही आग काही मिनिटांत अग्निशामक दलाने आटोक्यात आणली. यासाठी दोन गाड्या पाचारण केल्या होत्या. मात्र, या आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही, असे ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले.

Web Title: The bedroom on the 28th floor burned out