प्रेमसंबधाच्या गैरसमजेतून महिलेच्या अंगावर मिर्ची पावडर टाकून मारहाण

By सदानंद नाईक | Updated: June 12, 2023 19:59 IST2023-06-12T19:59:17+5:302023-06-12T19:59:36+5:30

सदानंद नाईक  उल्हासनगर : शेजारील महिले सोबत नवऱ्याचे प्रेमसंबंध असल्याच्या गैरसमजेतून महिलेच्या अंगावर मिर्ची पावडर टाकून मारहाण केल्याची घटना ...

Beating woman by putting chili powder on her body due to misunderstanding of love relationship | प्रेमसंबधाच्या गैरसमजेतून महिलेच्या अंगावर मिर्ची पावडर टाकून मारहाण

प्रेमसंबधाच्या गैरसमजेतून महिलेच्या अंगावर मिर्ची पावडर टाकून मारहाण

सदानंद नाईक 
उल्हासनगर :
शेजारील महिले सोबत नवऱ्याचे प्रेमसंबंध असल्याच्या गैरसमजेतून महिलेच्या अंगावर मिर्ची पावडर टाकून मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ५ जना विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२, भय्यासाहेब आंबेडकरनगर येथे सुनंदा पडघम राहत असून त्यांच्या घरासमोर मीरा ससाणे राहतात. नवऱ्याचे शेजारील सुनंदा हिच्या सोबत प्रेमसबंध असल्याच्या गैरसमजेतून मीरा ससाणे या महिलेने रविवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान सुनंदा या महिलेच्या अंगावर मिर्ची पावडर टाकून मारहाण केली. या मारहाणीत मीरा ससाणे यांच्यासह सीमा देठे, संजीवनी ससाणे, तेजस्वी ससाणे व रेशमी ससाणे या महिलांचा सहभाग होता. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुनंदा पडघम या महिलेच्या नातेवाईक महिलांनाही त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ५ जणी विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Beating woman by putting chili powder on her body due to misunderstanding of love relationship