घरातील वीजदिवे सुरू ठेवले म्हणून पत्नीस मारहाण; उल्हासनगरमधील घटना
By सदानंद नाईक | Updated: March 4, 2024 21:05 IST2024-03-04T21:04:17+5:302024-03-04T21:05:01+5:30
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

घरातील वीजदिवे सुरू ठेवले म्हणून पत्नीस मारहाण; उल्हासनगरमधील घटना
उल्हासनगर : कॅम्प नं-१, शिवसेना शाखेजवळ राहणाऱ्या कंचन भरत यादव यांनी घरात दिवे सुरू ठेवल्याच्या रागातून पती भरत यादव यांनी मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या कंचन भरत यादव या रविवारी रात्री साडे दहा वाजता घरी असतांना पती भरत यादव यांनी घरातील विजेचे दिवे सुरू का ठेवले? असा प्रश्न केला. यावरून दोघात तू तू मैं मैं होऊन यादव याने पत्नी कंचन हिला शिवीगाळ करून डोके दरवाजावर आपटून जखमी केले. शिवीगाळ व मारहाण प्रकरणी कंचन यादव यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसानी भरत यादव यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.