उल्हासनगरमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST2021-04-27T04:41:52+5:302021-04-27T04:41:52+5:30

उल्हासनगर : चुलत बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून दाेघा भावांनी एका तरुणाला रविवारी सकाळी १० वाजता जबर मारहाण केली. अविनाश ...

Beaten out of love marriage rage in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून मारहाण

उल्हासनगरमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून मारहाण

उल्हासनगर : चुलत बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून दाेघा भावांनी एका तरुणाला रविवारी सकाळी १० वाजता जबर मारहाण केली. अविनाश पवार असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे़ मारहाणीत त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी धीरेंद्र व नरेंद्र पवार यांच्याविराेधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं. २, आंबेडकरनगरमध्ये राहणारा अविनाश पवार याने परिसरातील मुलीसोबत प्रेमविवाह केला. मुलीच्या घरच्यांचा प्रेमविवाहाला विरोध होता. अविनाश पवार हे रविवारी सकाळी १० वाजता रमाबाई आंबेडकरनगर येथून मोटारसायकलवरून भाजीपाला आणण्यासाठी जात होते. पत्नीच्या चुलतभावांची आईही रस्त्याने जात होती. नंतर चुलतभाऊ धीरेंद्र व नरेंद्र यांनी अविनाशला लोखंडी रॉडने मारून जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

---------------------

Web Title: Beaten out of love marriage rage in Ulhasnagar