शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

ऑनलाइन व्यवहार करताना सावधान..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 00:53 IST

आॅनलाइन व्यवहार, सोशल मीडियावरील प्रलोभने याद्वारे ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाण्याचे प्रकार ठाणे जिल्ह्यात बरेच वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिक या जाळ्यात कसे अडकतात व मोठी रक्कम गमावून बसतात, याचा घेतलेला आढावा...

जितेंद्र कालेकर

आॅनलाइन व्यवहारांसाठी केंद्र सरकार तसेच बँकांकडून आग्रह धरला जातो. त्यातून बँकेच्या मनुष्यबळाची, खातेदारांच्या वेळेची आणि काही प्रमाणात पैशांचीही बचत होते, हे काही प्रमाणात वास्तव आहे. पण, जिथे फायदे तिथे काही तोटेही असतात. आॅनलाइन व्यवहार करताना जराही चूक झाली, तर त्याचा मोठा फटका हा संबंधित ग्राहकाला बसतो. बँकेच्या के्रडिटकार्ड तसेच एटीएमकार्डद्वारे व्यवहार करताना निष्काळजीपणा केला किंवा एखादी लिंक शेअर केल्यास, फोनवरून बँकेच्या संबंधित महत्त्वाची माहिती दिल्यास अथवा सोशल मीडियाद्वारे एखाद्या प्रलोभनाला बळी पडल्यास हमखास फसवणूक होण्याची भीती आहे. त्यातही वयोवृद्ध आणि अशिक्षित खातेदारांचा सर्रास फसवणुकीचा एकतरी प्रकार दररोज ठाणे शहर किंवा ग्रामीणमधील कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात नोंद होतो. महिन्याला अशा ५० ते ६० गुन्ह्यांची नोंद होऊन साधारण २० ते २५ कोटींची यात फसवणूक होत असल्याचा अंदाज आहे. ज्येष्ठ नागरिकांनी यात थोडीशी सावधानता बाळगली, तरी अशा आर्थिक फसवणुकीपासून होणारे धोके टाळता येऊ शकतात, असा सल्ला ठाणे शहर पोलिसांनी दिला आहे.वयोवृद्ध व्यक्ती कोणत्याही बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवत ठग मंडळी आत शिरतात. कोणतेही काम करण्याची ज्येष्ठांची गती इतरांच्या तुलनेत तशी कमी असते. याचाच गैरफायदा घेऊन त्यांच्या पाठीमागे उभे असलेले भामटे एटीएममधील व्यवहार लवकर करण्यासाठी तगादा लावतात. या अनावश्यक घाईमुळे ही वयोवृद्ध व्यक्ती पूर्णपणे गोंधळात पडते. अशावेळी लगेचच तिथे असलेला त्यांच्यातील एक ठकसेन ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीसाठी पुढे सरसावतो. त्यांचे एटीएम तथा क्रेडिटकार्ड तो त्यांच्याकडून गोड बोलून मिळवतो. अगदी सहजपणे त्यांच्याकडून या कार्डचा तो पिन (परवलीचा आकडा) क्रमांकही घेतो. आता कार्ड आणि त्यापाठोपाठ पिन क्रमांक मिळाल्यावर आजोबांना मदत करण्याच्या बहाण्याने तो त्यांच्या खात्यातून पैसे काढून देतो. त्याचवेळी त्यांच्या बँक खात्याचा तपशील माहीत करून घेतो. बऱ्यापैकी रक्कम शिल्लक असल्याचे जाणल्यानंतर संबंधित खातेदाराचे एटीएमकार्ड तो स्वत:कडेच ठेवतो. या भामट्यांकडे वेगवेगळ्या बँकांची मुदतबाह्य एटीएमकार्डं अगोदरच असतात. त्यातलेच या कार्डशी मिळतेजुळते एक कार्ड तो या आजोबांच्या हातावर ठेवतो. कालांतराने त्यांच्या मूळ कार्डाचा वापर करून त्यातील हवी तितकी रक्कम सफाईदारपणे काढून हा भामटा पसार होतो. हा प्रकार झाल्यानंतर या वयोवृद्ध खातेदाराच्या मोबाइल क्रमांकावरही अशी रक्कम कोणीतरी काढल्याचा मेसेज येतो. पण, तो मेसेज कळण्याइतपतही आजोबांना तांत्रिकज्ञान अवगत नसते. तसेच फारसे कोणी त्याकडे लक्षही देत नाही. दुसऱ्यांदा पैशांची गरज पडते, त्यावेळी या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या खात्यातून मोठी रक्कम लंपास झाल्याचे समजते. अर्थात, तोपर्यंत उशीर झालेला असतो. पण, उशिरा का होईना, या प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार करणेही आवश्यक आहे.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांतील सर्वच म्हणजे ३४ पोलीस ठाण्यांतर्गत रोज अशा प्रकारचा एकतरी प्रकार कुठे ना कुठे नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात. ठाणे ग्रामीणमधील मीरा रोड, भार्इंदर, भिवंडी या परिसरांमध्ये या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद झाल्याचे आढळते.आणखी एक हमखास घडणारा प्रकार म्हणजे एखाद्या बँकेचे नाव सांगून समोरील व्यक्ती वयोवृद्धांच्या मोबाइलवर फोन करते. तुमचे डेबिटकार्ड बंद होणार आहे किंवा तुमचे बँक खाते बंद होणार असल्याचा दावा करत ही व्यक्ती बँकेचा आणि डेबिटकार्डचा तपशील विचारते. त्यानंतर, तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक तत्काळ पाठवा. सुरुवातीला काही पैसे जातील, पण ते पुन्हा खात्यात जमाही होतील, असेही सांगितले जाते. समोरील व्यक्तीच्या विश्वास संपादनासाठी सुरुवातीला हे भामटे अगदी नाममात्र रक्कम काढतात. पुन्हा कालांतराने ती रक्कम बँक खात्यात टाकतात. अशा दोनतीन व्यवहारांनंतर दोन तासांच्या अंतराने हा भामटा संबंधित बँक खात्यातून लाखांच्या रकमा काढून पसार होतो. हे लक्षात आल्यानंतर संबंधित फोनवर त्या व्यक्तीचा काहीच शोध लागत नाही. एकतर, ते फक्त अशाच फसवणुकीच्या कामांसाठी उपयोगात आणलेले असतात किंवा ते दिल्ली किंवा नोएडा भागातील कोणाच्या तरी नावावर असतात. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर लगेचच याचा शोध लागेल, याचीही काही शाश्वती नसते. त्यामुळे फोनवरून बँकेचे व्यवहार करणे टाळावे. कोणालाही अशा प्रकारे ओटीपी क्रमांक दिला जाऊ नये. तुमचे एटीएमकार्ड किंवा डेबिटकार्ड बंद होणार असल्याचा फोन बँकेतून कधीच केला जात नाही. यात केवळ वयोवृद्धांनाच फसवले जाते, असेही नाही. पण, वयोवृद्ध व्यक्ती या जाळ्यात अगदी सहज अडकतात.आणखी एक असाच प्रकार म्हणजे एखाद्या वेबसाइटची लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर पाठवली जाते. ही लिंक उघडल्यानंतर त्यात मोठ्या रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवले जाते. ठरावीक रक्कम गुंतवल्यानंतर सहा महिन्यांनी आकर्षक व्याजाची रक्कम दिली जाईल. तसेच भारतातील मोठ्या हॉटेलांमध्ये तरुण मुली तुमच्या सेवेला असतील, अशी लालूच दाखवली जाते. काही वयस्कर आंबटशौकीन अशा लिंकच्या जाळ्यात अडकतात. सुरुवातीला या योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी ठरावीक रक्कम एखाद्या बँकेत भरण्यास सांगितले जाते. पुढे ही रक्कम भरल्यानंतर जीवनभर याचा लाभ मिळण्यासाठी चार ते पाच लाखांची रक्कम भरण्याचा आग्रह केला जातो. निवृत्तीनंतर हाताशी असलेली मोठी रक्कम आणि आता आयुष्यभर मजा करता येईल, या लालसेपोटी काहीजण ही मोठी रक्कम भरतात. पण, रक्कम भरल्यानंतर पुढे दरमहिना मिळणारा परतावा किंवा एखाद्या हॉटेलमध्ये सेवेसाठी असणारी तरुणी हा सर्वच प्रकार फसवा असल्याचे उघड होते. आता फसगत झाल्यानंतर कोणाला हे सांगण्याचीही सोय नसते. ठाण्यातल्या नौपाड्यासारख्या सुशिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीमध्येही एकाची साडेचार लाखांची आणि दुसºया एका ६५ वर्षीय नागरिकाची साडेपाच लाखांची फसवणूक झाल्याचे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. ज्या क्रमांकावरून ही लिंक येते किंवा गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त केले जाते, पुढे तो मोबाइल क्रमांक बंद पडतो. अगदीच शोध घेतला, तर तो झारखंडसारख्या बाहेरील राज्यात लागतो. या प्रकरणाचा शोध घेणे, हे पोलिसांना आव्हान असते, असे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ म्हणाले. एकदा ठाण्यात असा प्रकार केल्यानंतर पुढे महाराष्ट्रातील दुसºया टोकाला असा प्रकार करून राज्याबाहेर ही मंडळी वृद्धांना गंडवतात. फेसबुकवरून हमखास फसवणूक होणारा आणखी एक प्रकार असाच आहे. बºयाचदा छानपैकी परदेशी मॉडेलचा प्रोफाइल फोटो असलेल्या तरुणीकडून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली जाते. भारतामध्ये एकाकी असलेल्या ज्येष्ठांना विरंगुळा हवा म्हणून तेही अशी रिक्वेस्ट मोठ्या विश्वासाने आणि आनंदाने स्वीकारतात. काही दिवस ‘चॅटिंग’ झाल्यानंतर भारतातील या फेसबुक फ्रेण्डचा या तरुणीवर चांगलाच विश्वास बसतो. नेमके हेच हेरून ती काही दिवसांनी भारतात आल्याचे भासवते. दिल्लीमध्ये विमानतळावर पकडले असून आपल्याला विमान तिकीट आणि इतर कस्टम दंडासाठी ३५ ते ५० हजारांची रक्कम भरावयाची असल्याचेही ती सांगते. हा सर्व प्रकार खरा मानून ठाण्यातील एखादे ‘सद्गृहस्थ’ लगबगीने संबंधित नाव दिलेल्या आणि बँक खात्यावर ती रक्कमही भरतात. नंतर, मात्र त्यांची ही फेसबुकवरील मैत्रीण तेथून अनफ्रेण्ड झालेली असते. ती पुन्हा आपले नाव आणि बँक खाते बदलून दुसºयाला गंडा घालण्यासाठी अन्यत्र जाळे टाकत असते. वागळे इस्टेट भागात ठाण्यातील एका नामांकित व्यक्तीला अलीकडेच अशा प्रकारे फसवण्यात आले. पण, त्याने काही मित्रांचा सल्ला घेतल्यानंतर त्याची यातून सुटका झाली. ठाणे शहर आयुक्तालयात अशा दररोज कुठेना कुठे घटनांची नोंद होत आहे. वर्षभरात सर्वच प्रकारच्या फसवणुकीतून करोडो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.अशाच प्रकारे फेसबुकवरून काही वयस्कर महिलांनाही लग्नाचे प्रलोभन दाखवून त्यांच्याशी जवळीक साधली जाते. पुढे या महिला प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या की, त्यांच्याकडून वाटेल तेवढे पैसे उकळून हे फेसबुकवरील तथाकथित फ्रेण्ड गायब होतात. ठाण्यात वर्तकनगर येथील एका शिक्षिकेला तब्बल ३५ लाखांचा गंडा काही दिवसांपूर्वी घालण्यात आला होता. अशाच एका प्रकरणात बरीच मेहनत घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलने थेट दिल्लीतून एका टोळीला अटक केली होती. पण, अशा अनेक टोळ्या देशभरात कार्यरत आहेत. त्या असेच सावज हेरत असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा, फेसबुक आणि इंटरनेटचा वापर अतिशय सावधपणे करण्याचा मोलाचा सल्ला ठाणे शहर पोलिसांच्या सायबर सेल विभागाने दिला आहे.क्रेडिटकार्डद्वारे आॅनलाइन होणारी फसवणूक टाळण्यासाठी अशा कार्डचा १६ अंकी क्रमांक तसेच पिन क्रमांक, कार्डच्या मागे असलेला तीन अंकी सीव्हीव्ही क्रमांक किंवा आपली व्यक्तिगत माहिती फोन तसेच ई-मेलवरून कोणालाही देऊ नका.आपले डेबिटकार्ड रद्द होणार आहे किंवा आपले केवायसी अद्ययावत करावयाचे आहे, असे सांगून भामटे

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रonlineऑनलाइनCrime Newsगुन्हेगारी