वटवाघळाची शिकार करणारे गजाआड, बदलापूरची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:22 IST2017-09-07T02:22:42+5:302017-09-07T02:22:57+5:30
सामाजिक कार्यकर्ते रेजील मेनन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वन अधिकाºयांनी सापळा रचून वटवाघळाची शिकार करणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे.

वटवाघळाची शिकार करणारे गजाआड, बदलापूरची घटना
बदलापूर : सामाजिक कार्यकर्ते रेजील मेनन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वन अधिकाºयांनी सापळा रचून वटवाघळाची शिकार करणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे. मनोज मंडल व रोहित मंडल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन जिवंत वटवाघुळ जप्त करण्यात आली आहेत. वटवाघळांना इजा झालेली आहे. वन अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी ही कारवाई केली आहे. मेनन यांनी ग्राहक बनून शिकाºयांशी वटवाघुळाचा व्यवहार केला होता. त्यासाठी त्यांनी आरोपी मंडल बंधूंना पाचशे रुपये आगाऊ रक्कम दिली होती.
एका वटवाघुळाची रक्कम तीन हजार रुपये असेल असे शिकाºयांनी मेनन यांना सांगितले होते. दोन दिवस या शिकाºयांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्यांच्यावरच झडप घालून दोघांना अटक करण्यात आली.