शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवींचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 09:58 IST

एचडीएफसी बँकेचे बेपत्ता अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह कल्याणमध्ये सापडला आहे.

ठाणे : एचडीएफसी बँकेचे बेपत्ता अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह कल्याणमध्ये सापडला आहे. कल्याणमधील हाजी मलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. बँकेच्या उपाध्यक्षपदी वयाच्या 37व्या वर्षीच बढती मिळाल्याच्या ईर्षेतून एका सहकाऱ्याने संघवी यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. तसेच ठाणे जिल्ह्यात निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह फेकल्याची माहिती मारेकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांची पथके रवाना झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला आहे. 

मलबार हिल येथील रहिवासी असलेले संघवी हे कमला मिलमध्ये एचडीएफसीच्या बँकेच्या कार्यालयात कार्यरत होते. 5 सप्टेंबरला रात्री दैनंदिन काम संपवून ते निघाले. मात्र, ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी 6 सप्टेंबरला तक्रार दिली. शुक्रवारी कोपरखैरणेच्या सेक्टर 19  मध्ये त्यांची कार सापडली. त्यामध्ये रक्ताचे डाग, तसेच चाकू आढळून आला. रविवारी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने सरफराज शेख या तरुणाला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली.

संघवी काम संपवून कार घेण्यासाठी पार्किंग लॉटमध्ये गेले. तेथेच दबा धरून असलेल्या मारेकऱ्यांनी चाकूने वार करत त्यांची हत्या केली. रात्री सव्वाअकराच्या सुमारास त्यांची गाडी परळच्या धनमिल नाका परिसरातून जाताना दिसली. त्यामुळे तब्बल दोन ते तीन तास कमला मिलच्या पाचमजली पार्किंग लॉटमध्येच हत्याकांडाचा थरार घडला, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. संघवींना नुकतीच बढती देण्यात आली होती. आपल्याला डावलून संघवींना बढती देण्यात आल्याचा राग एका सहकाऱ्याच्या मनात होता. त्यानेच संघवी यांचा काटा काढण्यासाठी त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

टॅग्स :Murderखूनkalyanकल्याणPoliceपोलिस