बांगलादेशी घुसखोर रडारवर, १५ ठिकाणी २०० हून अधिक बांधकाम मजुरांसह फेरीवाल्यांची कोपरी पोलिसांकडून ‘ओळखपरेड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 08:00 IST2025-02-17T07:59:52+5:302025-02-17T08:00:14+5:30
अभिनेता सैफअली खान याच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे उघड झाले. गुन्हेगारी क्षेत्रातही बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारने दिले आहेत.

बांगलादेशी घुसखोर रडारवर, १५ ठिकाणी २०० हून अधिक बांधकाम मजुरांसह फेरीवाल्यांची कोपरी पोलिसांकडून ‘ओळखपरेड’
ठाणे : बांगलादेशी घुसखोरांची मोठी समस्या बनल्यामुळे या घुसखोरांना देशाबाहेर घालविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या हद्दीतील हॉटेल, बांधकाम, फेरीवाले आदी ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली आहे. वेगवेगळया १५ ठिकाणी शोध मोहीम राबवून तब्बल २२५ संशयित व्यक्तींची ‘ओळखपरेड’ घेण्यात आल्याची माहिती काेपरी पाेलिसांनी दिली.
अभिनेता सैफअली खान याच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे उघड झाले. गुन्हेगारी क्षेत्रातही बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारने दिले आहेत.
संशयास्पद परिसरात शोध मोहीम आखण्याची सूचना ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत.
कोपरी पोलिसांनी त्यानुसार सुरक्षेसाठी ठाणे पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल, बांधकाम, फेरीवाले यांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सुरू ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली.
बेकायदा प्रवेश करून बांगलादेशी नागरिक
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी करीत आहेत. कोपरीतील बांधकामांच्या साइट्स, हॉटेल, फेरीवाले, फळभाज्या विक्रेते आदी ठिकाणी भेट देऊन बांगलादेशी नागरिकांची पोलिस तपासणी करीत आहेत.
मुंबई, ठाण्यात सेंट्रिंग करणे, स्लॅब टाकणे, प्लास्टर, लादी अशा छोट्या-मोठ्या कामांसाठी स्वस्तात दुसऱ्या राज्यातील मजूर उपलब्ध होतो. त्यामुळे मोठ्या संख्येने महाराष्ट्राबाहेरील नागरिक रोजगारासाठी आल्याचे आढळले. मात्र, याच गोष्टीचा फायदा बांगलादेशी घुसखोर घेतात. काही ठिकाणी बांगलादेशी नागरिकही आढळून आले आहेत. त्यामुळे आयुक्त डुंबरे यांच्या आदेशाने काेपरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संशयास्पद जागांच्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम सुरू ठेवली आहे.
निशिकांत विश्वकार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरी पोलिस ठाणे
आतापर्यंत १५ आस्थापनांसह वेगवेगळया ठिकाणी २२५ नागरिकांची कागदपत्रे तपासली आहेत. बांगलादेशी घुखोराबाबत कोणाकडे माहिती असल्यास, काेपरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संशयास्पद जागांच्या ठिकाणी कुणी आढळल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, आवाहनही काेपरी पोलिसांनी केले आहे.