शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

टाकाऊ, दुर्लक्षित जागेवर साकरले फुलपाखरु उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 7:14 PM

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून येथील परबवाडी भागात फुलपाखरु उद्यान साकारण्यात आले आहे. येत्या ८ फेब्रुवारी पासून ते सर्वांसाठी खुले होणार आहे.

ठळक मुद्देफुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या वृक्षांची लागवडनागरीकांना फिरण्यासाठी जागा

ठाणे - ठाण्यातील परबवाडी येथे टाकाऊ आणि दुर्लक्षित राहिलेल्या जागेवर आता फुलपाखरु उद्यानाने आकार घेतला आहे. त्यानुसार या उद्यानाचे लोकापर्ण शुक्रवारी होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकापर्ण करण्यात येणार असून या उद्यानाची संकल्पना सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी आखली होती.                  फुलपाखरु उदयानाच्या जवळ जवळ १७०० चौ.मीटरच्या जागी यापुर्वी मोठया प्रमाणात कचरा, डेब्रीज व टाकावू वस्तू टाकून तेथे रॅबिटचे डोंगर तयार झाले होते. त्यामुळे या विभागात दुर्गंधी, डास याचा प्रादूर्भाव वाढला होता. तसेच या भागात काही ठिकाणी अतिक्र मण होऊन झोपडयाही बांधण्यात आल्या होत्या. पावसाळयात पाणी साचून तेथे मच्छरांची मोठया प्रमाणात पैदास होत होती. अशा ठिकाणी वारंवार साफसफाई करु न सुध्दा तोच प्रकार घडत होता. त्यामुळे यावर उपाय काढताना विचार आला की, या ठिकाणी मोठी झाडे आहेत एक गार्डन तयार करण्याची संकल्पना पुढे आली होती. परंतु सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक नरेश म्हस्के यांनी इंटरनेटवर सर्च केले असता, त्यांच्या डोक्यात ही फुलपाखरु उद्यानाची संकल्पना आली. या संकल्पनेतून सुंदर, सुशोभित व फुलपाखरांना आकर्षित करेल अशा विविध प्रकारची झाडे लावून फुलपाखरु उदयान बनविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या उदयानात पेंटास, करवंदा, लॅण्टना येलो, लॅण्टना हळदीकूंकूम, लॅण्टना लॅव्हंडर अ‍ॅण्ड व्हाईट, पावडर पफ, फॅमिलिया, क्युफिया, इक्सोरा, पिंक, रेड ही झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमुळे फुलपाखरं आकर्षित होत असून, सकाळच्या वेळी मोठया प्रमाणात फुलपाखरांचे थवेच्याथवे या उदयानात येत आहेत. तसेच रॅफिज पाम ही झाडे लावण्यात आली असून, या झाडांमध्ये फुलपाखरे लपून बसत आहेत. या आगळया-वेगळया उदयानामध्ये नागरीकांना फिरण्यासाठी पायवाट, पदपथ, लॉन, हिरवळ, हॅगिंग ब्रीज तसेच पिंक, आॅरेंज, व्हाईट, रेड, पर्पल, ब्ल्यू, यलो अशा विविध प्रकारच्या कमळांसाठी पाण्याचे पॉट तयार करण्यात आले आहेत. तसेच नागरीकांना बसण्यासाठी गजीबो तयार करु न विविध सुविधा या उदयानात उपलब्ध करण्यात आलेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त