शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

अखेर बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्याला’ लागले टाळे, सत्ताधाऱ्यांचे अपयश की प्रशासनाचा हलगर्जीपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 3:25 PM

Thane News: दिल्लीत आप या पक्षाच्या वतीने मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना राबविली आहे. त्याच धर्तीवर ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून शहरात आपला दवाखाना ही संकल्पना राबविण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेण्यात आला. परंतु

ठाणे  - दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाणे महापालिका हद्दीत आपला दवाखाना सुरु करण्यात आला होता. यासाठी तब्बल १६० कोटींचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून केला जाणार आहे. त्यानुसार दोन वर्षापूर्वी पाच आणि त्यानंतर २० दवाखाने सुरु करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत  येथे तब्बल ७० हजार रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. परंतु आता प्रशासकीय घोळामुळे या महत्वांकाक्षी प्रकल्पाला अखेर शुक्रवारी टाळे लावण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे यात सत्ताधारी शिवसेनेचे देखील अपयश दिसून आले आहे. ही योजना सुरु करतांना जॉन्ईट व्हॅन्चरमध्ये सुरु करण्यात आली होती. त्यानुसार या कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरु होणो अपेक्षित होते. परंतु महापालिकेच्या प्रशासकीय घोळामुळे या कामाचे कार्याध्येश जी कंपनी निविदा प्रक्रियेत सहभागीच झाली नव्हती. त्या कंपनीला देण्यात आले होते. त्यामुळे बीलाचा देखील घोळ झाला असून त्यामुळेच या दवाखान्यांना अखेर टाळे लावले गेले आहे.दिल्लीत आप या पक्षाच्या वतीने मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना राबविली आहे. त्याच धर्तीवर ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून शहरात आपला दवाखाना ही संकल्पना राबविण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेण्यात आला. परंतु या योजनेला विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. असे असतांनाही शिवसेनेही ही योजना एकहाती मंजुरी करुन घेतली होती. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी पालिका १६० कोटींचा खर्च केला जाणार आहे. शहराच्या विविध भागात एकूण ५० आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्यात येणार आहेत. ठाणे महानगर पालिकेने मेडीकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ठाणो शहरामध्ये ‘आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना निश्चित केले. परंतु ठाणो पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत. त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये १० रु  पये दर आकारला जाणार होते. ‘आपला दवाखाना’ मुळे ठाणे  महानगर पालिकेला पाच वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी असे सुमारे १५९.६० कोटी खाजगी संस्थेला द्यावे लागणार होते. त्यामुळेच विरोध वाढला होता.

दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते यातील पाच दवाखान्यांचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु त्यानंतर दोन वर्षात एकही नवा दवाखाना संबधींत संस्थेला सुरु करता आला नव्हता. त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस संबधींत कंपनीने आणखी एका कंपनीला हे काम देऊन त्यांच्या माध्यमातून शहरात २० दवाखाने सुरु करण्यात आले होते. त्यानंतर या दवाखान्याच्या माध्यमातून आतार्पयत तब्बल ७० हजार नागरीकांनी याचा लाभ घेतला. तसेच काही ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रही आपला दवाखान्यात सुरु करण्यात आले होते. परंतु ज्या तिस:या कंपनीने हे काम हाती घेतले होते, त्याला या कामाचे बिलच मिळेनासे झाल्याने अखेर त्यांनी शुक्रवारी शहरातील सर्वच दवाखन्यांना टाळे लावले आहे. या कंपनीला सुमारे दिड कोटींचे बील अद्यापही मिळालेले नाही. तर ज्या कंपनीला या योजनेचा ठेका देण्यात आला होता. त्या कंपनीला देखील पालिकेने बील काढलेले नाही. त्यामुळे ही योजना अखेर बंद झाली आहे. प्रशासनाच्या घोळामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या झालेल्या दुलक्र्षामुळे ही योजना अखेर बंद झाली आहे. ऐन ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही योजना बंद पडल्याने त्याचा फटका आता सत्ताधारी शिवसेनेला सहन करावा लागणार आहे. यामध्ये आता सत्ताधारी शिवसेनेचे अपयश देखील दिसून येत आहे.

सध्याच्या परिस्थितीत आरोग्य सेवेला खुप महत्व आहे. त्यामुळे प्रशासनाने संबधींत कंपनीचे बील अदा करणे अपेक्षित आहे. तसेच संबंधीत दोन कंपनीमध्ये देखील काही मुद्यावरुन विरोधा भास दिसून आलेला आहे. परंतु यावर लवकरच तोडगा काढून पुन्हा आपला दवाखाना सुरु केला जाईल.(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका