भिवंडीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदनिमित्त नमाज पठण; सर्वत्र उत्साह
By नितीन पंडित | Updated: June 17, 2024 13:07 IST2024-06-17T13:07:13+5:302024-06-17T13:07:58+5:30
विविध मशिदी व मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी बकरा ईदची नमाज अदा केली.

भिवंडीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदनिमित्त नमाज पठण; सर्वत्र उत्साह
भिवंडी: जगभरातील मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा कुर्बानीचा सण सोमवारी शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मशिदी व मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी बकरा ईदची नमाज अदा केली.
भिवंडी शहरातील असलेल्या कोटरगेट, दिवानशहा दरगाह, आसबीबी, मामूभांजा, चांद तारासहित अनेक मशीदींमध्ये मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या ईद सणानिमित्त पोलिसांच्यावतीने कोटरगेट मशीद येथे मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच भिवंडी महापालिकेच्यावतीने कुर्बानी सेंटर तयार करण्यात आलेल्या ठिकाणी बकरा आणि रेड्याची कुर्बानी देण्यात आली. तर दुसरीकडे अखंडता कायम टिकून राहावी यासाठी मुस्लिम बांधवांसह सर्वच जातीधर्माच्या नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.