रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला मिळाली रिक्षेत राहिलेली बॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 17:04 IST2017-10-20T17:04:10+5:302017-10-20T17:04:51+5:30
एसटीच्या संपामुळे एक महिलेवर आलेलं मोठं संकट एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे टळलं आहे.

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला मिळाली रिक्षेत राहिलेली बॅग
कल्याण- एसटीच्या संपामुळे एक महिलेवर आलेलं मोठं संकट एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे टळलं आहे. कुर्ला येथे राहणाऱ्या जयश्री आपल्या भावा सोबत दिवाळीनिमित्त नगरला निघाल्या होत्या. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना बस न मिळाल्याने त्यांनी थोडा वेळ कल्याणला नातेवाईकांच्या घरी विश्रांतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला.
एसटी स्थानककावरून एक रिक्षेने त्या आपल्या नातेबाईंकच्या घरी गेल्या. पण काही वेळाने त्यांना आपली एक बॅग हरवली असल्याचं लक्षात आलं. त्या बॅगेत त्यांनी आपल्या आईला देण्यासाठी काही दागिने,भेटवस्तू आणि पैसे असा अंदाजे लाखभर रुपयांचा ऐवज ठेवला होता. त्यांना आपण रिक्षेत बॅग विसरलो असल्याची शक्यता वाटल्याने त्यांनी खडकपाडा भागात रिक्षा चालकांकडे त्याची चौकशी केली. तेव्हा तिथे पेपरचा स्टॉल असणाऱ्या पेपर वाल्यांनी बॅग खडकपाडा पोलीस ठाण्यात सुखरूप ठेवली असल्याचं सांगितलं. ही माहिती मिळाल्यानंर जयश्री यांनी भावासह पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांना हवरवलेली बॅग सापडली. विशेष म्हणजे त्या बॅगेतील सामान जसंच्या तसं होतं. ती बॅग रिक्षाचालक गणेश यांनी स्वतःच पोलीस ठाण्यात नेऊन दिली होती आणि रिक्षा स्टँडजवळील पेपर स्टॉलवर त्या संदर्भातील निरो दिला होता. ऐन दिवाळीचा दिवशी आलेलं संकट गणेशसारख्या प्रामाणिक रिक्षाचालकांमुळे टळलं. गणेश यांचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला.