शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे, पाणीटंचाईने बदलापूरकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:11 IST

बदलापूरमध्ये पाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर झालेली नाही.

बदलापूर : बदलापूरमध्येपाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ भाजपने बदलापूरमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.गुरु वारी बदलापूर पश्चिम येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कूळगाव बदलापूर नगरपालिकेतील भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यंदा चांगला पाऊस झाला असून धरणे भरली आहेत. बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा, सानेवाडी, रमेशवाडी आदी भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एखाद्या दुष्काळग्रस्त भागाप्रमाणे महिलांना कपडे धुण्यासाठी नदीवर जावे लागत आहे. तर पिण्यासाठी बाटलीबंद पाणी वापरावे लागत आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांसह आपण हे आंदोलन केल्याची माहिती घोरपडे यांनी दिली. पाणीटंचाईचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जांभूळ येथील फिल्टरेशन प्लांटमधून ५ एमएलडी पाणी उचलण्याचा सोपा मार्ग आहे.२००५ च्या महापुरानंतर बॅरेज धरण वाहून गेले. त्या वेळी या प्लान्टमधून बदलापूरसाठी पाणी घेण्यात आले होते. त्यासाठी वाहिनीचीही जोडणी केलेली होती. फक्त व्हॉल्व्ह सुरू करून पाणी घ्यायचे होते, मात्र तेही करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पाणी वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही स्वस्थ बसणार नाहीयासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ कार्यालयातील अधिकाऱ्यांश्ी चर्चा करण्यात आली असून त्यांनी लवकरच पाणीसमस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असले तरी पाणी समस्या दूर होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही घोरपडे यांनी दिला आहे.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर