शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी नेलं अन् लिंबू पाणीतून...; तरुणीवरील अत्याचार प्रकरणी मैत्रिणीसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 19:12 IST

बदलापूरमध्ये गुगींचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Badlapur Crime : कोलकाता आरजे कार हॉस्पिटल आणि बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. ठाण्यात अत्याचाराची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात एका तरुणीला मादक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी एका मुलीसह तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार बदलापूरच्या एका गावात घडला आहे.

बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत एका मुलीसोबत अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. २२ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एका मुलीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री घडली. बदलापूरच्या शिरगाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संतोष शिवराम रुपावते (४०), शिवम संजय राजे (२३) आणि अलिस्का उर्फ ​​भूमिका रवींद्र मेश्राम (२०) यांना अटक केली आहे.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अलिस्काने पीडितेला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावले होते आणि तेथे आणखी दोन लोक आधीच उपस्थित होते. पार्टीनंतर दोघेही बेडरूममध्ये दारू पिऊ लागले. पीडिता बाहेर जाण्यासाठी उठली तेव्हा तिने बरं वाटत नसल्याची  तक्रार केली. यामुळे अलिस्काने पीडितेला लिंबू पाणी प्यायला लावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या लिंबू पाण्यात काही मादक पदार्थ मिसळले होते आणि ते प्यायल्यानंतर पीडितेला चक्कर येऊ लागली आणि ती बेशुद्ध अवस्थेत पडली. त्यानंतर एका आरोपीने पीडितेला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली.

दरम्यान,  पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही संशयितांना तत्काळ अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार) आणि १२३ आणि इतर संबंधित कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. या गुन्ह्याबाबत पोलीस अधिक माहिती गोळा करत असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणे