मरणानंतरही हाल संपेनात! भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 16:47 IST2021-09-14T16:40:01+5:302021-09-14T16:47:14+5:30
सबवेमध्ये साचलेल्या पाण्यातून काढावी लागली वाट

मरणानंतरही हाल संपेनात! भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा
बदलापूर: शहरातील बेलवली भागात असलेल्या भुयारी मार्गात वर्षभर पाणी साचलेला असते. येथील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी देऊन लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आंदोलन करून देखील प्रशासनाला भुयारी मार्गाशी काहीही घेणे-देणे नसल्याचे आज प्रत्यक्षात समोर आले आहे.
बदलापूरमध्ये भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/uWJxB0dUIw
— Lokmat (@MiLOKMAT) September 14, 2021
बेलवली गावातील एका कुटुंबातील मृत व्यक्तीची अंत्ययात्रा या भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून आज स्मशानभूमीमध्ये न्यावी लागली. बेलवली गावातील स्मशानभूमीत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. भुयारी मार्गात पावसाळ्यात तसेच भुयारी मार्गालगत असलेल्या नाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणात साचतं. रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक बंद करून बेलवली स्मशान भूमीकडे जाण्याचा मार्ग काही महिन्यांपूर्वी संरक्षक भिंत घालून बंद केला. मात्र गावकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिली नाही.त्यामुळे नगरपालिका आणि रेल्वे प्रशासनानं याकडे तातडीने लक्ष देऊन याठिकाणी पादचारी पुल उभारून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.