शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर : चिमुकल्याचा स्कूल बसचालकाकडून लैंगिक छळ, जाब विचारणा-या वडिलांनाच बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 15:32 IST

वडील मंगेश पाटील यांनी मुलाची बस देखील बदलली होती. बस बदलल्यावरही बसचालक रवी लव्हाटे हा विद्यार्थ्याला रागाने...

बदलापूर: बदलापूर येथील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणा-या एका चिमुकल्याचा लैंगिक छळ शाळेच्या बस चालकाने केला आहे. हा प्रकार विद्याथ्र्याने पालकांना सांगितल्यावर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडीलांनाही या बस चालकाने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली आहे. या प्रकारानंतर आरोपी बस चालकाच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

बदलापूरात राहणारे मंगेश पाटील यांचा मुलगा हा गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकत आहे. शाळेचा बसचालक रवी लवाटे हा बसमधून प्रवास करणा-या पाटील यांच्या मुलासोबत अश्लिल चाळे करत होता. हा प्रकार त्या मुलाने आपल्या पालकांना सांगितला. तसेच या भितीने तो शाळेत जाण्यासाठी घाबरत होता. वडील मंगेश पाटील यांनी या प्रकाराचा जाब विचारला असता बसचालकाने त्याच्यावरच हल्ला केला. रवी लव्हाटे सोबत इतर त्याच्या बस चालक सहका-यांनी देखील पाटील यांना जबर मारहाण करत दहशत निर्माण केली. या प्रकारानंतर जखमी पाटील यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर बस चालक रवी लव्हाटे याच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलीसांनी अद्याप अटक केलेली नाही. 

दरम्यान, या प्रकरणात माहिती घेतली असता हा प्रकार 6 ते 9 महिन्यापूर्वीचा असून या प्रकरणाची तक्रार आल्यावर वडिलांनी विद्यार्थ्याची बस देखील बदलली होती. बस बदलल्यावरही लव्हाटे हा विद्यार्थ्याला रागाने पाहत होता. त्यामुळेच पाटील यांनी या प्रकरणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र बस चालकाने या पालकालाच मारहाण केली. या प्रकरणात पाटील यांनी केवळ बस चालकाकडे तक्रार केली होती. मात्र, शाळेकडे कोणतीच तक्रार केली नव्हती हे समोर आले आहे. 

‘‘रवी लव्हाटे हा नेहमीच माझ्या मुलासोबत अश्लिल चाळे करित होता. त्याचा  जाब विचारल्यावर त्याने हा हल्ला केला आहे. त्यात माझा आणि माझ्या मुलाची कोणतीच चुक नसतांना त्याने हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची तक्रार बस मालकाकडे केली होती. त्यानंतर बस देखील बदलली होती. मात्र लव्हाटे याने आधीचा राग कायम ठेवत त्या मुलाला त्रास देणे सुरुच ठेवले होते. 

    - मंगेश पाटील, वडील

‘‘ मंगेश पाटील यांनी मुलासोबत घडलेल्या प्रकाराची कोणतीच माहिती शाळा प्रशासनाला कधीच दिली नाही. 9 महिन्यांपूर्वी हा प्रकार असुन त्याची कल्पना बसमधील महिला प्रतिनिधीला देण्यात आलेली नाही. येवढेच नव्हे तर शाळेलाच नव्हे पालकांच्या मिटींगमध्ये देखील या प्रकाराची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. तक्रार आली असती तर योग्य कारवाई करणो शक्य होते. 

    - हितेंद्र नायक, ट्रस्टी, गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल

टॅग्स :Studentविद्यार्थीbadlapurबदलापूरSchoolशाळाBus Driverबसचालक