VIDEO- मुजोर रिक्षाचालक, भररस्त्यात तरूणीशी गैरवर्तन करून काढली औकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 16:40 IST2018-01-13T16:32:18+5:302018-01-13T16:40:28+5:30

कल्याण डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी दिवसागणिक वाढत चालली असून सर्व सामान्य प्रवासी या मुळे त्रस्त आहेत अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Auto Riksha driver misbehaviour with Girl on Road | VIDEO- मुजोर रिक्षाचालक, भररस्त्यात तरूणीशी गैरवर्तन करून काढली औकात

VIDEO- मुजोर रिक्षाचालक, भररस्त्यात तरूणीशी गैरवर्तन करून काढली औकात

कल्याण- कल्याण डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी दिवसागणिक वाढत चालली असून सर्व सामान्य प्रवासी या मुळे त्रस्त आहेत अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच कल्याण पूर्वेत एका मुजोर रिक्षा चालकाने तरुणासह त्याच्या बहिणीला शिवीगाळ करत असल्याचा फेसबुकवर व्हिडियो व्हायरल करण्यात आला आहे .त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमधून रिक्षा चालकांच्या या मुजोरीला कोण आळा घालणार असा सवाल उपस्थित केला आहे 

कल्याण पुर्वेकडील लोकग्राम परिसरात राहणारा गौतम भारद्वाज या  तरुणाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण स्टेशनहून मेट्रो मॉलकडे येण्यासाठी स्टेशन वरून रिक्षा पकडली.रिक्षा सुरू होताच या रिक्षा चालकाने भरधाव वेगाने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली .त्यामुळे गौतम ने रिक्षा चालकास रिक्षा हळू चालवण्यास सांगितले असता त्याने उद्धटपणे उत्तरे दिली. यावेळी रिक्षात बसलेल्या महिला प्रवाशांशी हि तो उद्धटपणे बोलत होता. गौतम याने रिक्षातून उतरल्यानंतर या रिक्षा चालकाला पैसे देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने सुट्ट्या पैशांवरून वाद घालण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर त्याने गौतम सह त्याच्या बहिणीला ही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी मध्यस्थी करण्यास आलेल्या वयोवृद्ध रिक्षाचालकला ही त्याने शिविगाळ केली .या संपूर्ण प्रकारचे गौतमने व्हिडीओ चित्रीकरण करत हा व्हिडीओ फेसबुकवर टाकला व ती लिंक पोलीस आयुक्तालयाला पाठवली हा व्हिडीओ कोळशेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने तो कोळशेवाडी पोलीस स्थानकाला पाठवला त्यानंतर कोळशेवाडी पोलिसांनी त्या मुलाला फोन करून पोलीस स्थानकात तक्रार करण्यास बोलावून घेतले.या प्रकरणी गौतमने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 


Web Title: Auto Riksha driver misbehaviour with Girl on Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.