शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प फुगवण्यातच सत्ताधाऱ्यांना स्वारस्य? सत्ताधारी भाजपानं केली तब्बल ६०३ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 15:11 IST

स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची लेखी तक्रार आयुक्तांना केली आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचा सन २०२० - २१ च्या अर्थसंकल्प १२६५ कोटी ८६ लाखां पर्यंतच आटोपला असताना सत्ताधारी भाजपाने मात्र सन २०२१ - २०२२ सालचा अर्थसंकल्प मात्र तब्बल २११२ कोटींचा मंजूर केला आहे . प्रशासनाने सादर केलेल्या १५०९ कोटींच्या अर्थसंकल्पात सत्ताधाऱ्यांनी तब्बल ६०३ कोटींची वाढ केली आहे . सत्ताधाऱ्यांनी महसुली उत्पन्न पेक्षा अर्थसंकल्प अव्वाच्या सव्वा फुगवला असतानाच दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेने स्थायी समितीच्या आकडेवारीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेचा २०२१ - २०२२ सालचा प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त दिलीप ढोले यांनी स्थायी समितीला सादर केला होता . तो अर्थसंकल्प १५०९ कोटी १७ लाखांचा होता . परंतु स्थायी समिती मध्ये ह्या अर्थसंकल्पात मोठी वाढ करून अर्थसंकल्प तब्बल २०६२ कोटी ६५ लाखांवर नेऊन ठेवला . मंगळवारी झालेल्या महासभेत त्यामध्ये आणखी वाढ करून अर्थसंकल्प २ हजार ११२ कोटींचा करण्यात आला आहे . सत्ताधारी भाजपाने एकूणच प्रशासनाच्या अर्थसंकल्पात तब्बल ६०३ कोटींची वाढ केली आहे. 

स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची लेखी तक्रार आयुक्तांना केली आहे . काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत आणि शिवसेनेच्या स्नेहा पांडे यांनी दिलेल्या पत्रात स्थायी समिती मध्ये जी आकडेवारी मंजूर झालेली होती त्यात परस्पर बदल करण्यात आला असून त्याची रेकॉर्डिंग तपासण्यात यावी . हि गंभीर बाब असल्याने कारवाईची मागणी सावंत व पांडे यांनी केली आहे . यामुळे स्थायी समितीने केलेला अर्थसंकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी , परिवहन सेवेत सध्या ५३ बस सुरु असताना परिवहन समिती साठी तब्बल २० कोटी देण्याची मंजुरी म्हणजे ठेकेदाराला पोसण्यासाठी जनतेच्या पैशांची लूट सत्ताधारी भाजपने चालवल्याचा आरोप केला आहे . विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील यांनी सुद्धा सत्ताधारी भाजपने अर्थसंकल्प फुगवून अनावश्यक कामे काढून टेंडर - टक्केवारी साठी जनतेच्या पैशांचा दुरुपयोग चालवल्याचा आरोप केला आहे. 

दुसरी कडे सभापती दिनेश जैन म्हणाले कि , आकडेवारी बाबत सावंत यांचा गैरसमज झाला होता तो दूर केला आहे. सत्ताधारी म्हणून शहराचा विकास आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊनच अर्थसंकल्प केला आहे . विरोधक नाहक खोटे आरोप करत आहेत. मंगळवारी स्थायी समितीने २०६२ कोटींचा अर्थसंकल्प महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या कडे सादर केला होता . महासभेत २११२ कोटी पर्यंत वाढवून मंजूर करण्यात आला .  प्रशासनाच्या १५०९ कोटींचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपाने २०११ कोटींवर नेऊन ठेवला आहे . गंभीर बाब म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच सन २०२० - २०२१ चा सुधारित अर्थसंकल्प हा केवळ १२६५ कोटी ८६ लाखांचा असल्याचा मंजूर केला आहे . म्हणजेच चालू वर्षाचा अर्थसंकल्प जर १२६५ कोटींचा असताना तो सत्ताधाऱ्यांनी २११२ कोटींवर फुगवण्याचा हेतू काय ? असा प्रश्न केला जात आहे . 

सत्ताधाऱ्यांनी कुठे फुगवले उत्पन्न 

कोरोना संसर्गा मुळे अर्थसंकल्प कोलमडले असताना सत्ताधाऱ्यांनी सूर्य पाणी योजनेसाठी शासना कडून मिळणारे अनुदानाच्या अपेक्षित रकमेत तब्बल २९५ कोटींनी वाढ धरली आहे . या योजनेसाठी कर्ज घेण्याच्या रकमेत सुद्धा ५५ कोटींची वाढ केली आहे . मालमत्ता कराचे उत्पन्न तब्बल ४७ कोटींनी तर मालमत्ता हस्तांतरणचे उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे . मोकळ्या जागेच्या कराची वसुली होत नसताना त्यात सुद्धा त्याचे उत्पन्न ३० कोटींनी तर इमारत विकास आकार उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे . मुद्रांक शुल्क अधिभाराच्या उत्पन्नात तब्बल १० कोटींनी तर जाहिरात फलक उत्पन्न ५ कोटींनी वाढवले आहे . मुदत ठेवींवरील व्याज ५ कोटींनी वाढवले आहे . 

कुठे वाढवला  खर्च

सत्ताधाऱ्यांनी नगरसेवक निधी , प्रभाग समिती निधी , स्वेच्छा निधी , आदरातिथ्य भत्ता आदीं खर्च करण्याच्या तरतुदी मध्ये प्रचंड वाढ करून घेतली आहे . बांधकाम विभागाच्या खर्चात १२४ कोटींनी तर  विकास आराखडा अमलबजावणीच्या नावाखाली बांधकाम आदी विभागासाठीच्या खर्चात २१ कोटींनी वाढ केली आहे .  पाणी पुरवठा विभागासाठीच्या खर्चात तर तब्बल ४०८ कोटीं रुपयांची वाढ केली आहे . विशेष म्हणजे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या खर्चात कपात केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv Senaशिवसेना