शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

ठाण्याच्या वसंत विहारमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:06 PM

सोमवारी भल्या पहाटेच्या सुमारास ठाण्याच्या वसंतविहार मधील एका एटीएम केंद्रामध्ये शिरुन एटीएमचे मशिन फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न १८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरटयाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देचितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसोमवारी पहाटेची घटनाचोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद

ठाणे : वसंतविहार भागातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम केंद्राचे सुरक्षा लॉक तोडून मशिनमधील रोकड चोरण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटेच्या दरम्यान झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय स्टेट बँकेच्या वसंतविहार येथील एटीएम केंद्रात एका चोरट्यांने १७ मार्च रोजी रात्री ८ ते १८ मार्च रोजी सकाळी ८ वा. च्या दरम्यान शिरकाव करून मशिन क्रमांक एस १ एनबी च्या समोरील पॅनलचे स्क्रू काढून, पॅनल उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मशिनचे सुरक्षा लॉक आणि स्लीप प्रिंटर तोडून मशिनमधील रोकड चोरण्याचा प्रयत्न झाला. परंतु, बराच प्रयत्न करूनही त्याला हे लॉक तोडता आले नाही. अखेर कसली तरी चाहूल लागल्यानंतर तो तिथून पसार झाला. पहाटे २.४५ वा. च्या सुमारास एक चोरटा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बँकेचे मुख्य प्रबंधक रिजवान अन्सारी यांनी १८ मार्च रोजी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. घनवट हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी