शिवसेना शाखाप्रमुखावर हल्ल्याचा प्रयत्न

By Admin | Updated: October 11, 2016 03:03 IST2016-10-11T03:03:59+5:302016-10-11T03:03:59+5:30

निळजे गावातील शिवसेना शाखाप्रमुख सतीश पाटील यांच्यावर सोमवारी रात्री दोनच्या सुमारास जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची

Attempts to attack Shiv Sena chief | शिवसेना शाखाप्रमुखावर हल्ल्याचा प्रयत्न

शिवसेना शाखाप्रमुखावर हल्ल्याचा प्रयत्न

डोंबिवली : निळजे गावातील शिवसेना शाखाप्रमुख सतीश पाटील यांच्यावर सोमवारी रात्री दोनच्या सुमारास जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.
तीन बुरखाधारी तरुणांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करत त्यांचा मोबाइल हिसकावून नेला. मात्र, या हल्ल्यात बचावले आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा हल्ला लुटीच्या हेतूने केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मात्र हल्ल्याचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. खरोखरीच लुटीचा हेतू होता की अन्य काही कारणे हल्ल्यामागे होती याचाही शोध आणि माहिती पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Attempts to attack Shiv Sena chief