ठाणे : व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून वन्य पक्ष्यांची तस्करी करणाºया तिघांपैकी दीपक रामरूप निशाद (२५) याला ठाणे वनविभागाच्या अधिका-यांनी मुंबईतून अटक केली. त्याच्याकडून घार प्रजातीमधील तीन बहिरी ससाणे आणि एक पोपट असे चार पक्षी हस्तगत केले आहेत.केवळ व्हॉट्सअॅप ग्रुपवर चर्चा करून पुण्यातून आणलेले वन्य पक्षी मुंबईत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाण्याच्या वनविभागाला मिळाली होती. तिच्या आधारे दादर रेल्वे स्थानकासमोर रविवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास दीपकला जेरबंद केले. आता त्याला ज्यांनी या पक्ष्यांची विक्री केली, त्या पुण्यातील दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वनविभागाने दिली. दीपकला सुरुवातीला १० जानेवारीपर्यंत वन विभागाची कोठडी भोईवाडा न्यायालयाने दिली. तिची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्याला २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
व्हॉट्सअॅपद्वारे पक्ष्यांची तस्करी करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 02:12 IST