बिगारी कामगारावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST2021-03-26T04:40:29+5:302021-03-26T04:40:29+5:30

-------------------------------------- सोन्याचे दागिने लंपास डोंबिवली : पूर्वेकडील मानपाडा रोडवरील स्टार कॉलनी परिसरातील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारे राजेश मोटे ...

Attack on Bigari workers | बिगारी कामगारावर वार

बिगारी कामगारावर वार

--------------------------------------

सोन्याचे दागिने लंपास

डोंबिवली : पूर्वेकडील मानपाडा रोडवरील स्टार कॉलनी परिसरातील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारे राजेश मोटे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ११ ते २४ मार्च दरम्यान घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे.

----------------------------------------

दुकानात चोरीचा प्रयत्न

कल्याण : येथील पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळ महिपाल मनिषकुमार हे किराणा मालाचे होलसेल दुकान असून मंगळवारी मध्यरात्री या बंद दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. याची नोंद महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

---------------------------------------

रिक्षाची चोरी

कल्याण : पूर्वेकडील भागात राहणारे सचिन पावशे यांनी त्यांची रिक्षा ५ मार्चला संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान वालधुनी, एफ केबिन रोड येथील रस्त्यावर पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेली असून, या प्रकरणी त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

-------------------------------------------

दुचाकी चोरी

डोंबिवली : येथील पूर्वेकडील कचोरे परिसरातील न्यू गोविंदवाडी परिसरात राहणारे मोहम्मद शाह यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या अहमद रजा इंटरप्रायजेस दुकानासमोर पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------------------------------------

Web Title: Attack on Bigari workers