शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरण: बदलापुरातील संतप्त पालकांचं रौद्ररूप, पोलीस प्रशासनाला फुटला घाम

By पंकज पाटील | Updated: August 20, 2024 10:45 IST

बदलापुरात गेल्या आठवड्यात आदर्श महाविद्यालयातील एका सफाई कर्मचाऱ्यांनी दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोबत अत्याचार केला. या अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असली तरी शाळा प्रशासनाने दाखवलेला बेजबाबदारपणा पालकांना असाह्य झाल्याने आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती.

बदलापूर: बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयात शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज संतप्त बदलापूरकरांनी शाळा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला घाम फोडला. राजकारण्याची मदत न घेता बदलापूरकरांनी या अत्याचारा विरोधात रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवली.       बदलापुरात गेल्या आठवड्यात आदर्श महाविद्यालयातील एका सफाई कर्मचाऱ्यांनी दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोबत अत्याचार केला. या अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असली तरी शाळा प्रशासनाने दाखवलेला बेजबाबदारपणा पालकांना असाह्य झाल्याने आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन निदर्शने करण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. या निर्णयाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद लाभला. सकाळी सात वाजता शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ हजारो पालकांनी एकजूट होत निदर्शने केली. केवळ सोशल मीडियावर आंदोलनाचा निरोप पाठवून बदलापूरकरांना एकजूट होण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार शेकडो पालकांनी या अत्याचार विरोधात आपली दाखवलेली एकजूट ही पोलीस प्रशासनाला आणि शाळा प्रशासनाला घाम फोडणारी ठरली. असंख्य पालकांचा अनावर झालेला संताप पाहून त्यांना शांत करण्यात पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागली.

या आंदोलनात महिला पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तर तरुण मंडळी देखील या आंदोलनात उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचाराच्या विरोधात बदलापूरकरांनी दाखवलेली एकजूट पाहून आता राजकारणी देखील धास्तावले आहेत. अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वच बड्या राजकीय पुढार्‍यांना उशिरा जाग आल्यामुळे बदलापूरकरांनीच पुढाकार घेऊन हे आंदोलन यशस्वी केलंय.

टॅग्स :badlapurबदलापूरSchoolशाळाPoliceपोलिसStudentविद्यार्थी